Winter Skin Care : थंडीत मुलायम त्वचेसाठी लावा 'हा' पदार्थ, कोरडेपणा मिनिटांत होईल दूर

Shreya Maskar

खोबरेल तेल

कोरड्या त्वचेसाठी स्वस्तात मस्त आणि सर्वात फायदेशीर उपाय म्हणजे हिवाळ्यात त्वचेला खोबरेल तेल लावा. जेणेकरून त्वचा मऊ होईल.

Coconut oil | yandex

पोषक घटक

खोबरेल तेलात गुड फॅट्स असतात, जे आपल्या त्वचेवर संरक्षणात्मक थर तयार करतात. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि दीर्घकाळ मुलायम राहते.

Coconut oil | yandex

बदामाचे तेल

बदामाचे तेल त्वचेच्या सौंदर्यासाठी गुणकारी आहे. त्वचा चमकदार बनवण्याठी बदामाचे तेल खूप फायदेशीर ठरते.

Almond oil | yandex

पोषक घटक

बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई, फॅटी अ‍ॅसिड, प्रोटीन, झिंक हे महत्त्वाचे घटक असतात. ज्यामुळे त्वचा हेल्दी होते. तसेच बदामाचे तेल बाजारात सहज उपलब्ध आहे.

Almond Oil | yandex

एलोवेरा जेल

एलोवेरा जेल सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. एलोवेरा जेलपासून अनेक फेसपॅक देखील बनवले जातात. यामुळे त्वचा कापसासारखी मऊ होते.

Aloe vera gel | yandex

थंड वातावरण

थंड वातावरण त्वचेतील आर्द्रता शोषून घेते. अशावेळी त्वचेला ओलावा मिळावा म्हणून एलोवेरा जेलचा वापर करा. एलोवेरा जेलमुळे त्वचा मॉइश्चरायझ होते. रोज सकाळी उठल्यावर ऑलिव्ह ऑइलने त्वचेला मसाज करा.

Aloe vera gel | yandex

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-एजिंग घटक असतात. यामुळे त्वचेला कोणताही संसर्ग होत नाही. तसेच त्वचा मुलायम आणि चमकदार राहते.

Olive oil | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Coconut oil | yandex

NEXT : गाजर न किसता बनवता येईल हलवा, फॉलो करा 'ही' सिंपल ट्रिक

Grated Carrots | saam tv
येथे क्लिक करा...