Shreya Maskar
हिवाळ्यात गाजर मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होतात. त्यामुळे आवर्जून गाजर हलवा बनवला जातो. हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे.
गाजर हलवा बनवण्यासाठी गाजर किसायला लागतात. जे सर्वात अवघड आणि किचकट काम आहे आणि ते करायला खूप कंटाळा देखील येतो.
गाजर किसण्याची सर्वात सिंपल ट्रिक जाणून घेऊयात. जेणेकरून फक्त १०-१५ मिनिटांत गाजर हलवा तयार होईल आणि गाजर किसायला देखील लागणार नाही.
गाजर किसण्यासाठी गाजर धुवून त्याची सालं काढून घ्या. गाजर हलव्यासाठी लाल रंगाचा गाजर वापरला जातो.
हलवा करण्यासाठी गाजर अगदी कोवळी असावा. जेणेकरून गाजर हलव्याला चांगली चव येते आणि गाजर कापायला सोपा पडतो. गाजराचे लांब- लांब उभे काप करून घ्या. जास्त ही मोठे आणि जाडे काप करू नका.
कॅकरमध्ये तूप टाकून गाजराचे काप १०-१५ मिनिटे शिजवून घ्या. यात दूध आणि साखर टाका. यामुळे गाजर चांगला शिजतो.
कॅकरमध्ये गाजर २-३ शिट्टया करून शिजवून घ्या. यात जास्त दूध टाकू नका. नाहीतर दूध कुकर बाहेर येईल.
शेवटी गॅस बंद करून गाजराचे मिश्रण थंड करा. या सिंपल ट्रिकने गाजर मऊ आणि बारीक होईल.