
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.पहलगाममधील हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन पर्यटकांना सुरक्षितता मिळेल.
पर्यटन सुरक्षा दलाची स्थापना
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यामध्ये अनेक निष्पाप पर्यटकांचा जीव गेला. त्यामुळे पर्यटकांना कुठे फिरायला जातानादेखील भीती वाटत आहे. सध्या जम्मू काश्मीरमधील पर्यटन तर बंद झाले आहे. परंतु महाराष्ट्रात कधीही अशी परिस्थिती येऊ नये, याच पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात आली आहे.
थमिक तत्वावर तीन महिन्यासाठी महाबळेश्वर येथे 3 मे 2025 पासून पर्यटन सुरक्षा दल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत कार्यान्वित होईल. महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचा 4 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.
महाबळेश्वर येथे २ ते ४ मे २०२५ या कालावधी महाराष्ट्र महापर्यटन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अनेक कार्यक्रम होणार आहेत.दरवर्षी हा महापर्यटन उत्सव सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळीच हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाबळेश्वरमध्ये होणाऱ्या महापर्यटन उत्सवात अनेक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, किल्ले, शास्त्र प्रदर्शनी, फूड फेस्टिव्हल असणार आहे. याचसोबत हेलिकॉप्टर राईड, ड्रोन शो, योग, संगीत असे अनेक कार्यक्रम होणार आहेत.
पहलगाममधील हल्ल्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याचसोबत अनेक ठिकाणी पर्यटकांसोबत दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर पर्यटन सुरक्षा दल हा पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी काम करेन. त्यांना मदत करेन.जेणेकरुन अशी परिस्थितीत कधीच उद्भवणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.