वाळू धोरण होणार कडक; वाळू माफियांची आता खैर नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणणार नवे धोरण

Maharashtra Politics: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २४ फेब्रुवारीला राज्याचे वाळू धोरण जाहीर होईल, अशी माहिती उमरखेड येथे एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना दिली.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankulegoogle
Published On

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २४ फेब्रुवारीला राज्याचे वाळू धोरण जाहीर होणार असल्याची माहिती दिली. उमरखेड येथे एका कार्यक्रमात ते माध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रभर वाळू माफियांचा मोठा प्रभाव आहे, ज्यामुळे अनेक सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे, येत्या काळात वाळू सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी कडक उपाययोजना लागू केली जाणार आहेत, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

वाळू धोरणामध्ये सुधारणा करण्यात येणार असून, त्याअंतर्गत वाळूच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कडक केली जाईल. प्रशासन व अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेत प्रशासन कार्यरत राहील. यासाठी, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना शस्त्रधारी सुरक्षा कर्मचार्‍यांचा देखील पाठिंबा दिला जाईल.

Chandrashekhar Bawankule
Pune News: पुण्यात वाढत्या GBSच्या प्रभावाला रोखण्यासाठी महापालिका सज्ज, जलशुद्धीकरण मोहीम सुरू

मंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना कोणत्याही आमिषाला बळी न पडता न घाबरता कार्य करण्याचा आवाहन केला. यासोबतच, केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त योजनेंतर्गत शनिवारी २० लाख घरकुल धारकांना पुणे येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ऑनलाइन पहिला हप्ता वितरित करण्यात आला. या कार्यक्रमात महसूल मंत्री बावनकुळे देखील उपस्थित होते.

Chandrashekhar Bawankule
Action On Dargah: दर्ग्याच्या जागेवर मंदिर उभारणार? दर्ग्यावर कारवाई, नाशिकमध्ये तणाव

उमरखेड येथील पंचायत समिती प्रांगणात तालुक्याच्या पहिल्या हप्त्याचे प्रमाणपत्र देखील नागरिकांना देण्यात आले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाळू धोरणाबाबत कडक निर्णय घेतल्याचे सांगितले. वाळू माफियांच्या विरोधात कडक कारवाई केली जाणार असून, सामान्य लोकांसाठी वाळू उपलब्ध होईल, असे आश्वासन दिले.

Chandrashekhar Bawankule
Telangana tunnel collapse: बोगद्याचं काम सुरू असताना मोठी दुर्घटना, २४ तासांपासून ८ जण अडकले, NDRF म्हणाले आवाज दिला पण...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com