Post Office: पोस्टात जाण्याची झंझट संपली, आता मोबाईलवरूनच होणार सर्व कामं; Dak Seva 2.0 अ‍ॅप कसे वापरायचे?

India Post launches Dak Seva 2.0 App: पोस्ट ऑफिसने आपल्या ग्राहकांच्या फायद्यासाठी Dak Seva 2.0 अ‍ॅप सुरू केले आहे. या अ‍ॅपमुळे ग्राहकांना पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना घरबसल्या सर्व कामं करता येणार आहेत.
Post Office: पोस्टात जाण्याची झंझट संपली, आता मोबाईलवरूनच होणार सर्व कामं; Dak Seva 2.0 अ‍ॅप कसे वापरायचे?
India Post launches Dak Seva 2.0Saam Tv
Published On

Summary -

  • इंडिया पोस्टने Dak Seva 2.0 नावाचे नवीन मोबाईल अ‍ॅप लाँच केले

  • पोस्ट ऑफिसची बहुतेक सेवा आता मोबाईलवर

  • अ‍ॅपवर पार्सल ट्रॅकिंग, मनी ऑर्डर, स्पीड पोस्ट फी कॅल्क्युलेटर आणि पेमेंट सुविधा उपलब्ध

  • अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीवर उपलब्ध आहे अ‍ॅप

पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. बँकेप्रमाणेत पोस्टाच्या अनेक योजनांमध्ये ग्राहकांकडून गुंतवणूक केली जाते. पोस्टाच्या अनेक योजाना या जबरदस्त असून त्याच्यातून खूप चांगला परतावा मिळतो. सुरक्षित आणि चांगला परतावा मिळावा यासाठी पोस्ट ऑफिसच्या योजनांकडे पाहिले जाते. पोस्ट ऑफिसशी संबंधित सर्व कामं करण्यासाठी ग्राहकांना पोस्ट ऑफिसमध्येच जावे लागते. पण आता पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची ग्राहकांची झंझट संपणार आहे. पोस्टाशी संबंधित सर्व कामं ग्राहकांना घरबसल्या करायला मिळणार आहे.

भारतीय पोस्टाने नवीन मोबाईल अ‍ॅप तयार लाँच केले आहे. या अ‍ॅपचे नाव Dak Seva 2.0 असे आहे. या मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून पोस्ट ऑफिसशी संबंधित सर्व कामं घर बसल्या करता येणार आहेत. या मोबाइल अ‍ॅपद्वारे तुम्ही पोस्ट ऑफिसच्या सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकता. भारतीय पोस्टनेच याबाबत माहिती दिली आहे. या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना पैशांचे व्यवहार देखील करता येतील.

Post Office: पोस्टात जाण्याची झंझट संपली, आता मोबाईलवरूनच होणार सर्व कामं; Dak Seva 2.0 अ‍ॅप कसे वापरायचे?
Post Office Diwali Scheme : टपाल खात्याची खास दिवाळी भेट! नोंदणी करून घरबसल्या विदेशात पाठवता येणार 'या' गोष्टी ,जाणून घ्या सविस्तर

भारतीय पोस्टाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती शेअर केली आहे आणि त्याची वैशिष्ट्ये देखील सांगितली आहेत. या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'आता तुम्हाला तुमच्या खिशात पोस्ट ऑफिस मिळेल.' त्यांनी काही फोटो देखील शेअर करत या अ‍ॅपच्या वैशिष्ट्यांची तपशीलवार माहिती दिली. हे सिंगल अॅप तुम्हाला मनी ऑर्डर, पार्सल ट्रॅकिंग, कुरिअर व्हॅल्यू कॅल्क्युलेशन आणि पीएलआयसाठी पेमेंट करण्याची परवानगी देते.

Post Office: पोस्टात जाण्याची झंझट संपली, आता मोबाईलवरूनच होणार सर्व कामं; Dak Seva 2.0 अ‍ॅप कसे वापरायचे?
Post Office SCSS Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून कमवा २.४६ लाख रुपये; कॅल्क्युलेशन वाचा

Dak Seva 2.0 अ‍ॅपद्वारे ग्राहकांना कम्पलेट मॅनेजमेंटचे देखील पर्याय मिळतो. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही केलेल्या कम्पलेटचे स्टेटस देखील पाहायला मिळणार आहे. यासाठी तुम्हीला या अ‍ॅपवर स्वत:चे प्रोफाइल बनवावे लागेल. जर तुमचे पोस्टामध्ये सेव्हिंग अकाऊंट असेल तर या अ‍ॅपद्वारे तुम्ही अकाऊंटसंबंधी सध्याची अपेडट आणि सर्व माहिती चेक करू शकता.

Post Office: पोस्टात जाण्याची झंझट संपली, आता मोबाईलवरूनच होणार सर्व कामं; Dak Seva 2.0 अ‍ॅप कसे वापरायचे?
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज २०० रुपये गुंतवा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

Dak Seva 2.0 अ‍ॅप लाँच झाले असून ते अँड्रॉइड आणि आयओएससाठी उपलब्ध आहे. Dak Seva 2.0 अ‍ॅपमध्ये एक सिंपल युजर इंटरफेस देण्यात आले आहे. या द्वारे तुम्ही स्पीड पोस्ट इत्यादींसाठी फी कॅलक्युलेट करू शकता. आपले पार्सलचे ट्रॅकिंग डिटेल्स देखील तुम्हाला या अ‍ॅपवर पाहायला मिळतील. महत्वाचे म्हणजे या अ‍ॅपला तुम्ही आपल्या आवड्या भाषेमध्ये वापरू शकता. अ‍ॅपमध्ये भाषा बदलण्यासाठी वरच्या बाजूला एक आयकॉन देण्यात आला आहे. यामध्ये २३ भारतीय भाषा आहेत. हिंदी, इंग्रजी, मराठी आणि बंगालीसह २३ भाषांचे पर्याय उपलब्ध आहेत.

Post Office: पोस्टात जाण्याची झंझट संपली, आता मोबाईलवरूनच होणार सर्व कामं; Dak Seva 2.0 अ‍ॅप कसे वापरायचे?
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! पत्नीसोबत एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ९,२५० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com