Ahmednagar News : चक्क पोस्टाने ड्रग्सची तस्करी; पुण्याहून मागविलेले पार्सल स्वीकारताच पोलिसांनी घेतले ताब्यात

Ahmednagar News : पुणे येथून टपाल सेवेद्वारे एक पार्सल अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर डाक कार्यालयात जाणार आहे. त्यामध्ये अमली पदार्थ असण्याची शक्यता आहे; अशी माहिती मुंबईच्या एनसीबी अधिकाऱ्यांनी अहमदनगर पोलिसांना दिली
Ahmednagar News
Ahmednagar NewsSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

श्रीरामपूर (अहमदनगर) : डाक सेवेद्वारे मागविलेले अमली पदार्थाचे पार्सल श्रीरामपूर डाकघर कार्यालयात आले. यानंतर पोलिसांनी सापळा लावून पार्सल स्वीकारणाऱ्या एकास श्रीरामपुरातून ताब्यात घेतले. हे पार्सल कोणी पाठवले याचा शोध आता पोलिस घेत आहेत. मात्र श्रीरामपूर सारख्या ग्रामीण भागात चक्क पोस्टाद्वारे ड्रग्जची तस्करी होत असल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पुणे (Pune) येथून टपाल सेवेद्वारे एक पार्सल अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर डाक कार्यालयात जाणार आहे. त्यामध्ये अमली पदार्थ असण्याची शक्यता आहे; अशी माहिती मुंबईच्या एनसीबी अधिकाऱ्यांनी अहमदनगर (Ahmednagar) पोलिसांना दिली. तसेच त्या पार्सलचा नंबरही कळविला होता. यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने श्रीरामपूर येथील पोस्ट ऑफिस कार्यालयात डाकघर अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली. सदरचे पार्सल श्रीरामपूर डाक घर येथे आले असल्याची आणि ते पार्सल विक्रांत राऊत (पूर्णवादनगर वॉर्ड नं. ७, श्रीरामपूर) यांनी मागवल्याची माहिती मिळाली. 

Ahmednagar News
Ghati Hospital : घाटी रुग्णालयात कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड, आयकार्डही बंधनकारक; ड्रेस नसल्यास नो एन्ट्री

दरम्यान एक महिला पोस्टमन राऊत याला पार्सल देण्यासाठी स्कूटरवरून दिलेल्या पत्त्यावर निघाल्या. त्यांच्या मागे पोलिस पथकातील कर्मचारी सापळा रचून गेले. पोस्टमनने पार्सल धारकास फोन केला असता एक व्यक्ती आली. त्याने पार्सल स्वीकारले आणि पार्सल स्वीकारणारी व्यक्ती आरोपी असल्याचे (Police) पोलिसांच्या निदर्शनास येताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित राऊत यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून १२ हजार २०० रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीरामपूर सारख्या ग्रामीण भागात पोस्टाद्वारे हे ड्रग्ज नेमके कुणी पाठवले? आणि अहमदनगर जिल्ह्यात ड्रग्ज तस्करीचे रॅकेट कार्यरत आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com