Ghati Hospital : घाटी रुग्णालयात कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड, आयकार्डही बंधनकारक; ड्रेस नसल्यास नो एन्ट्री

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात एक्स रे विभागातील तरुणीचा विनयभंग आणि वार्डातील कर्मचाऱ्यांनी परस्पर बदली कर्मचारी कामावर ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याला आता ड्रेस कोड व आयकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कर्मचारी ड्रेस कोडमध्ये नसल्यास त्याला रुग्णालयात नो एंट्री राहणार असल्याचे नियम रुग्णालय प्रशासनाने लावले आहेत. 

छत्रपती संभाजीनगरच्या (sambhajinagar) घाटी रुग्णालयात एक्स रे विभागातील तरुणीचा विनयभंग आणि वार्डातील कर्मचाऱ्यांनी परस्पर बदली कर्मचारी कामावर ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी घाटी रुग्णालयात (Ghati Hospital) बाहेरचे कर्मचारी कामावर ठेवले जात असल्याची बातमी 'साम टीव्ही'ने दाखवली होती. त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि तात्काळ हा निर्णय घेतला आहे. तसेच याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. 

Sambhajinagar News
Fake Notes Racket : भुसावळ बनावट नोटांचा अड्डा? पुन्हा घबाड सापडलं, असे सापडले 'बंडल'बाज!

तर विभाग प्रमुख जबाबदार 

घाटी रुग्णालयात समोर आलेल्या या दोन प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासनाने आता कठोर पावल उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता घाटी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड शिवाय एन्ट्री नसेल. शिवाय आयडी कार्ड देखील असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळं रुग्णांशी गैरवर्तनाचा किंवा विनयभंगाचा प्रकार घडल्यास वार्ड प्रमुख आणि विभाग प्रमुख सर्वस्वी जबाबदार राहतील; असा निर्णय घाटी प्रशासनाने घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com