Fake Notes
Fake NotesSaam tv

Fake Notes Racket : भुसावळ बनावट नोटांचा अड्डा? पुन्हा घबाड सापडलं, असे सापडले 'बंडल'बाज!

Jalgaon News : भुसावळ शहरात बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी ४ सप्टेंबरला तिघांना तीन लाख रुपयांच्या बनावट नोटांसह ताब्यात घेतले होते.
Published on

भुसावळ (जळगाव) : भुसावळ शहरात मागील आठवड्यातच तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या होत्या. यानंतर पुन्हा एकदा बनावट नोटा आढळून आल्या असून बाजारपेठ पोलिसांनी ५० हजाराच्या या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामुळे या मागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

भुसावळ (Bhusawal) शहरात बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी ४ सप्टेंबरला तिघांना तीन लाख रुपयांच्या बनावट नोटांसह ताब्यात घेतले होते. या संशयितांनी दिलेल्या माहितीवरून पुन्हा ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा बाजारपेठ पोलिसांनी जप्त केल्या आहेत. संशयित सय्यद मुशाईद अली मुमताज अली याच्याकडे अधिक चौकशी केली असता, नोटा घेण्यासाठी चिखलदरा येथील संशयित राहुल राजेंद्र काबरा याच्यासोबत दोन महिन्यांपूर्वी बऱ्हाणपूर येथे गेला व संशयित प्रतीक नवलखे (रा. मालविया वार्ड, बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) बनावट नोटा (Fake Notes) छापतो व व्यवहार करतो, याबाबतची माहिती दिली होती. 

Fake Notes
Jalgaon Crime : कारसमोर चक्कर येऊन पडला; मदत करणाऱ्या व्यापाऱ्याला लुटले, कारमधून सव्वा लाख लंपास

दोन जण झाले फरार 

तर संशयित अब्दुल हमीद कागल याची चौकशी केली असता त्याने सय्यद मुशाईद अली मुमताज अली (रा. जळगाव) याचा मित्र राहुल काबरा याने कागल याच्याकडे महिन्यापूर्वी ५० हजारांच्या बनावट नोटा दिल्याची कबुली दिली. त्यावरून बाजारपेठ पोलिसांनी कागल याच्या घरातून बनावट नोटा जप्त केल्या आहेत. संशयित राहुल काबरा व प्रतीक नवलखे गुन्हा घडल्यापासून फरारी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com