जळगाव : रस्त्याच्या बाजूला कार उभी केल्यानंतर कारच्या समोर येऊन चक्कर आल्याने एकजण जमिनीवर कोसळला. त्याला उचलण्यासाठी धावलेल्या व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे. कारमध्ये ठेवलेली सव्वालाख रुपयांची बॅग घेऊन चोरटे पसारझाले होते. मात्र अवघ्या दोन तासात त्यांना पकडण्यात यश आले आहे.
गुजरात राज्यातील सुरत येथील व्यापारी हिरेनभाई किरीटभाई रावल हे (Bhusawal) भुसावळला कामानिमित्ताने आले होते. दरम्यान ते जळगावात (Jalgaon) दाखल झाले असताना दादावाडी जैन मंदिराबाहेरील एटीएमजवळ कार उभी केली. त्याच वेळी एक तरुण त्यांच्या कारसमोरच चक्कर येऊन खाली पडला. या तरुणाला त्याला उचलण्यासाठी चालकासह हिरेनभाई मदतीला धावले. याच वेळी चोरट्यांनी कारमधील रोकड असलेली बॅग लंपास केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर हिरेनभाई यांनी बॅग चोरीला गेल्याची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली. त्यावरून गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान चोरटे भुसावळच्या दिशेने गेल्याचे समजताच चालक महेश सूर्यवंशी यांनी पोलिस वाहनाने त्या दिशेने रावण झाले. मात्र (Jalgaon Police) पोलिस पिच्छा करत असल्याचे कळताच चोरट्यांनी दुचाकी सोडून शेतातून पळ काढला. गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून जितेंद्र रंगलाल चव्हाण (वय ३२), रवींद्र मधुकर जाधव (३१, दोघे रा. टाहकळी, ता. मुक्ताईनगर), बंडू जेता राठोड (२८, मोझीरा, ता. मुक्ताईनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चोरीची एक लाख २० हजारांची रक्कम मिळून आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.