Indian Railway Freepik
महाराष्ट्र

Special Trains: प्रवाशांना मोठा दिलासा! विशेष साप्ताहिक रेल्वे गाड्या आणखी तीन महिने धावणार

Indian Railway: उन्हाळी सुट्यांमध्ये उत्तर आणि दक्षिण भारताकडे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विविध मार्गांवरील विशेष साप्ताहिक रेल्वेगाड्यांचा सेवा कालावधी वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Dhanshri Shintre

उन्हाळी सुट्यांमध्ये उत्तर आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा विचार करून मध्य रेल्वेने विविध मार्गांवर धावणाऱ्या विशेष साप्ताहिक रेल्वे गाड्यांचा सेवा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

या गाड्या आणखी अडीच ते तीन महिने सुरू राहणार आहेत. पुणे रेल्वे विभागातील दौंड-अजमेर (०९९२६) आणि सोलापूर-अजमेर (०९६२८) या साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन सुरुवातीला २७ मार्च २०२५ पर्यंत करण्यात आले होते. मात्र, वाढत्या मागणीनुसार या दोन्ही रेल्वेगाड्यांचा कालावधी २६ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे, अजमेर ते सोलापूर (०९६२७) विशेष रेल्वे ९ एप्रिलपासून २५ जूनपर्यंत धावणार होती, मात्र आता ती २६ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच, शिर्डी ते बीकानेर (०४७१६) साप्ताहिक विशेष रेल्वे सुरुवातीला ३० मार्च २०२५ पर्यंत चालविण्याचा निर्णय झाला होता, पण प्रवाशांची वाढती गर्दी पाहता २९ जून २०२५ पर्यंत सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, दादर-भुसावळ (०९०५१) विशेष रेल्वे आठवड्यातून तीन वेळा धावत होती आणि तिची सेवा ३१ मार्चपर्यंत नियोजित होती. आता या रेल्वेचा कालावधी वाढवून ३० जून २०२५ पर्यंत चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या निर्णयामुळे उन्हाळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होणार असून, गर्दीच्या दिवसांत प्रवास अधिक सुलभ होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT