Solapur : भाजपचा वाद चव्हाट्यावर, माजी मंत्री सुभाष देशमुखांचा स्वपक्षातील नेत्यांना सूचक इशारा, नेमकं प्रकरण काय?

Subhash Deshmukh: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत रंगत वाढत असून, या पार्श्वभूमीवर भाजप आमदार आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी निवडणुकीबाबत महत्त्वाचे विधान करून राजकीय वातावरण तापवले आहे.
Subhash Deshmukh
Subhash Deshmukhgoogle
Published On

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चुरस वाढताना दिसत आहे. उमेदवारी अर्जाच्या छाननीदरम्यान माजी आमदार दिलीप माने आणि काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांच्या अर्जांवर हरकत घेण्यात आली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी निवडणुकीसंदर्भात मोठे विधान केले. भाजपमध्ये कोणत्या निवडणुकीचे नेतृत्व कोणी करायचे, हा गौण विषय आहे, असे त्यांनी सांगितल्याने त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

माजी सहकारमंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शड्डू ठोकला. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्याला तिकीट मिळावे. कार्यकर्त्यांनी उभे राहावे. त्यामुळे भाजपकडून मी उभा राहणारा आहे. कोण माझ्यासोबत आलं तर मी त्यांच्यासोबत असणार आणि नाही आलं तर मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार. भाजप आमदार सुभाष देशमुख यांचा स्वपक्षातील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.

Subhash Deshmukh
Shirdi News: व्हीआयपींना पहाटेच दर्शन द्या, सुजय विखे यांची साईबाबा संस्थानकडे मागणी

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत वरिष्ठांची चर्चा झाली नाही. भाजप कार्यकर्त्यांना घेऊन निवडणूक लढवणार. आम्ही सगळेजण एकत्र येऊन निवडणूक लढवली तर वरिष्ठांचं काही म्हणणं नसतं. निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे जायचं हा विषय भाजपमध्ये गौण आहे. तुम्हाला कोणी माहिती सांगितली असेल तर ती मला सांगा तुमच्या सूत्रांची माहिती मला द्या. विनाकारण आमच्यात भांडण लावू नका. मी कोणतीही निवडणूक ताकदीने लढतो. मी काय लेचापेचा लढत नाही किंवा मी तडजोड करत नाही असेही सुभाष देशमुख म्हणाले.

Subhash Deshmukh
Nagpur Accident: नागपुरात मोठा अपघात; चालकाचे नियंत्रण सुटले कार थेट भिंतीवर धडकली, ५ जण गंभीर जखमी

मागच्या निवडणुकीत सर्व विरोधात होते. पक्षातले ही अधिकृत विरोधात होते. तरीही मी भाजप म्हणूनच निवडणूक लढणार. दरम्यान भाजप आमदार आणि मावळते सभापती विजयकुमार देशमुख यांनी यंदाच्या निवडणुकीतून माघारी घेतल्याचे जाहीर केलं आहे. मागील निवडणुकीत विजयकुमार देशमुख यांनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत पॅनल बनवत सुभाष देशमुख यांच्याविरोधात निवडणूक जिंकली होती. मागीलवेळी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार होता, यंदा मात्र पूर्ववत निवडणूक होत आहे त्यामुळे मी निवडणुकीतून माघार घेत असल्याच माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com