Girish Mahajan on Maratha Reservation Saam Tv
महाराष्ट्र

Girish Mahajan: 'सरसकट आरक्षण देणं शक्य नाही', गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांना स्पष्टच सांगितलं

Girish Mahajan on Maratha Reservation: सरसकट आरक्षण देणं शक्य नाही आणि 24 तारखेचा हट्ट धरू नये, असं मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Girish Mahajan on Maratha Reservation:

सरसकट आरक्षण देणं शक्य नाही आणि 24 तारखेचा हट्ट धरू नये, असं मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं आहे. आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. त्यावेळी महाजन यांनी सरकारची भूमिका जरांगे यांच्यासमोर मांडली.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले की, ''विधानसभेचे सत्र काल संपलं. त्यात चार दिवस चर्चा झाली. त्यात मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा केली. मागे दिलेलं आरक्षण टिकलं नाही म्हणून संपूर्ण विचार करुन हे आरक्षण दिलं जाईल. सरकार साकारात्मक आहे. त्या मुळे या ठिकाणी विनंती करायला आलो आहे.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले, ''शिंदे समिती आणि निवृत्त न्यायाधीश यांनी मागच्या वेळेस जे बोलण झालं. त्यात सगेसोयरे याचा उल्लेख केला. पण तसं होत नाही, मुलीकडे सोयरे रक्ताच्या नात्यात येत नाही. त्यावर थोडं संभ्रम निर्माण झाला आहे. तो ही प्रश्न सुटेल.''  (Latest Marathi News)

महाजन पुढे म्हणाले, ''हा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा आहे, तेही लवकर एक महिन्यात होईल. शिंदे समिती काम करत आहे, ते काम चालूच असणार आहे. दुर्दैवान मागचं आरक्षण कोर्टाने फेटाळलं. आता कुठल्या ही आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला मराठा आरक्षण द्यायचंच आहे.''

ते म्हणाले, आमच्याकडून सोयरे हा शब्द आलेला आहे. ते कायद्यात बसत नाही. यावर अडलं आहे. हे ही लवकर सुटेल. सोयऱ्यात बायकोचे नातेवाईक येतात, त्यांना देता येत (आरक्षण) नाही. महिलेकडे आरक्षण कधीच जात नाही. सुप्रीम कोर्ट ही हा शब्द नाकारेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबात हजारो नागरिक आणि शेतकऱ्यांची गर्दी..

ज्या बापाने बोट धरून चालायला शिकवलं, त्याच्याच अंत्यविधीसाठी मुलाला वेळ नाही; महाराष्ट्रात मन हेलावून टाकणारी घटना

5 Things You Should Never Give to Others: या 5 गोष्टी चुकूनही दुसऱ्याला देऊ नका

5 Gram Gold Mangalsutra: 5 ग्रॅम सोन्यामध्ये महिलांसाठी सुंदर मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाइन्स

मुंबईच्या ५ स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले अन् ताटात काय दिसलं? प्रसिद्ध डॉक्टरांचा थेट तुकाराम मुंढेंकडे संताप

SCROLL FOR NEXT