आमचा विश्वासघात झालाय, असं मराठा नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिली होती. ही मुदत संपायला अवघे तीन दिवस शिल्लक असताना आज अंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) आज सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आहे. या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, संदीपान भुमरे उपस्थित आहेत. याच शिष्टमंडळाची संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
सर्वांना सरसकट आरक्षण देणं शक्य नाही आणि ते कोर्टात टिकणारही नाही, असं शिष्टमंडळात जरांगे यांची भेट घेण्यसाठी आलेय महाजन यांनी म्हटलं आहे. तर जरांगे पाटील हेही आपल्या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. तुम्ही लिहून दिलं तेच मागतोय, असं जरांगे यावेळी म्हटले आहेत. यावर 'लिहून देताना आमच्याकडून अज्ञानपणे झालं असेल', असं महाजन म्हटले आहे.
सगेसोयरे आणि रक्तातील नातेवाईकांना आरक्षण द्या. तसेच सरसकट या शब्दावर आम्ही ठाम असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. यातच सगेसोयरे कोण? यावरून ही आरक्षणाची चर्चा अडली आहे. सग्या-सोयऱ्यांसाठी कायदा बदलता येत नाही, असं या शिष्टमंडळाने जरांगे यांना सांगितलं आहे. तर जरांगे यांनी सरसकट आरक्षणावर आपण ठाम असल्याचं म्हटलं आहे. जमेत नसेल तर तुमचा आणि आमचा रस्ता मोकळा आहे, असंही त्यांनी सरकारच्या शिष्ठमंडळाला सांगितलं आहे.
सरकारी शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात काय झाली चर्चा?
शिष्टमंडळाची चर्चा करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत की, ''जे लिहलं आहे, त्यावर आम्ही ठाम आहे. शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचं निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. जे लिहलं त्यावर बोला. रक्ताच्या सगेसोयरे यांना घ्यावं, असं त्या दिवशी लिहलं होतं. मी तीन पर्याय दिले होते. नातेवाईक, सगेसोयरे आणि ज्यांना मिळालेलं आहे त्यांना, असं लिहलं होतं.'' ते म्हणाले, संगेसोयरे म्हणजे रक्ताच्या नात्यातील सर्वांना, बायकोच्या नात्यातील सर्व सोयऱ्यांना आरक्षण द्यावं.''
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.