Devendra Fadnavis on Deputy CM Saam TV
महाराष्ट्र

Devendra Fadnavis on Resign: सर्वात मोठी बातमी; सरकारमधील जबाबदारीमधून मला मोकळं करावं; देवेंद्र फडणवीसांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

Devendra Fadnavis Want Resign From Deputy Chief Minister Post: मला सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती पक्ष नेतृत्त्वाकडे करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत केली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत त्यांनी हे मोठं विधान केलंय.

Bharat Jadhav

मुंबई: राज्यातील राजकारणतील सर्वात मोठी बातमी समोर आलीय.देवेंद्र फडणवीस यांना सरकारमधून बाहेर पडण्याचं असून त्यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवलीय. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप कमी जागा आल्यात. राज्यातील पराभवाची जबाबादारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारीमधून मोकळ करावं, अशी मागणी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केलीय.

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षातील नेत्यांनी वरपासून ते खाली तळापर्यंत मेहनत घेतली.मात्र राज्यात भाजपला कमी जागा आल्यात. परंतु जनतेने आम्हाला नाकारलं नसल्याचं देवेंद्र फडणीस म्हणाले. राज्यात लोकसभा निवडणुकीचं नेतृत्व आपण करत होतो, त्यामुळे राज्यात आलेल्या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचं फडणवीस म्हणाले. राज्यात कमी जागा मिळाल्यात त्यात मी कुठेतरी कमी पडलो असून,त्यामुळे आपण पराभवाची जबाबदारी घेत असल्याचं फडणवीस म्हणाले.

यामुळे आपण भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे विनंती करतो की,पक्षाने मला विधानसभेसाठी पूर्णवेळ काम करायचं आहे. त्यामुळे मला सरकारमधील जबाबदारीमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्णवेळ काम करण्याची जबाबदारी द्यावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केलीय. सरकारमधून मोकळं झाल्यामुळे ज्या काही कमतरता राहिल्या आहेत, उणिवा आहेत, त्यावर काम करता येईल,असंही फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. आमच्या अपेक्षापेक्षा खूप कमी जागा मिळाल्या. महाराष्ट्रात आमची लढाई महाविकास आघाडीसोबत होती त्यासोबतच नरेटिव्हसोबत करावी लागली. त्यामध्ये सविंधान बदलणार असा नरेटिव्ह तयार करण्यात आला. हा नरेटिव्ह आम्हाला थांबवता आला नाही. त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, त्याचा आम्हाला फटका बसल्याचं फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Appliances Deal: 'या' कंपनीने लाँच केली खास ऑफर! टीव्ही, फ्रिज, एसी फक्त १ रुपयांत घरी आणण्याची सुवर्णसंधी

Maharashtra Live News Update: मेगा ब्लॉकमुळे 'मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस' रद्द

Period Leave: नोकरदार महिलांसाठी गुड न्यूज, १२ दिवसांची मासिक पाळीची रजा मिळणार

HBD Rekha : ७१ व्या वर्षी तरुणींना लाजवेल असं सौंदर्य, रेखा यांच्या लांबसडक केसामागचं रहस्य काय?

कर्तव्य बजावत असताना साताऱ्यातील जवानाचा मृत्यू; चंदीगडमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन

SCROLL FOR NEXT