Maharashtra Election: लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात कुणाची घरं फुटली, कुठं नाती दुभंगली!

Maharashtra Loksabha Election सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. यंदाच्या लोकसभेच्या मैदानात एकाच कुटुंबातील, एकाच परिवारातील व्यक्ती आमनेसामने आहेत. त्यामुळे राजकारणामुळे नाती तर दुभंगली जाणार नाहीत ना, असा प्रश्न आहे. पाहुयात.
Maharashtra Election
Maharashtra Election Saam Tv

मुंबई: नात्या-नात्यांमधल्या लढती महाराष्ट्राच्या राजकारणाला काही नवीन नाहीत. या लोकसभा निवडणुकीतही अशाच काही लढती पाहायला मिळणार आहेत. कुठं कुणाचा नवरा एका पक्षात तर त्याची बायको दुसऱ्या पक्षात, कुठं कुणाचा बाप एका तर मुलगा दुसऱ्या पक्षात. कुठं भाऊ-बहीण दोन वेगवेगळ्या पक्षात. एकाच कुटुंबातली माणसं वेगवेगळ्या पक्षात राहून राजकारण करताहेत. लोकसभेच्या राजकीय आखाड्यात अशीच काही नाती आमनेसामने येणार आहेत.(Latest News)

मुंबईत गजानन कीर्तिकर आणि अमोल कीर्तिकर या बाप-बेट्यात कटुता आली. बाप शिवसेना शिंदे गटात तर मुलगा शिवसेना ठाकरे गटात मुलगा अमोल कीर्तिकर मुंबई उत्तर पश्चिममधून ठाकरे गटाकडून उभा राहिलाय. आता शिवसेना शिंदे गटानं या जागेवर मुलाविरुद्ध बापाला उभं करू नये म्हणजे मिळवली.

तिकडे धाराशिवमध्येही दीर-भावजय आमनेसामने आलेत. धाराशिवमधील राजेनिंबाळकर आणि पाटील या दोन घराण्यातील कौटुंबिक आणि राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता ओमप्रकाश राजेनिंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील म्हणजे दीर-भावजय अशी लढत होणार आहे. तिकडे बारामतीमध्ये तर पहिल्यांदाच थेट पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे.

जुलै 2023मध्ये राष्ट्रवादीची दोन शकले झाली. अजित पवारांनी महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना तर शरद पवारांनी कन्या सुप्रिया सुळे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं. त्यामुळे बारामतीत पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. ही काही प्रातिनिधिक उदाहरणं असली तरी राज्यातल्या अनेक राजकीय कुटुंबात कमीअधिक फरकानं हीच स्थिती पाहायला मिळत आहे. राजकारणामुळे कुटुंबं दुभंगू नयेत हीच अपेक्षा.

Maharashtra Election
Maharashtra Politics: पवारांचा डाव, भाजपला घाव! 3 बडे नेते 'शिवरत्न'वर एकत्र येणार; माढ्यासह सोलापूरचं समीकरण बदलणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com