NCP Merger: सुनील तटकरेंना विलिनीकरणाची कल्पना नव्हती का? अमोल कोल्हेंनी केला मोठा खुलासा

Amol Kolhe On Sunil Tatkare: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत आपल्याला कल्पना नव्हती असं विधान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर आता खासदार अमोल कोल्हे यांनी मोठा खुलासा केला.

विलिनीकरणाबाबत आपल्याला काहीच कल्पना नव्हती असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली. साम टीव्हीला दिलेल्या ब्लॅक अँड व्हाईट या मुलाखतीमध्ये अमोल कोल्हे यांनी विलिनीकरणाबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत. विलिनीकरणाच्या बैठकीला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नव्हते का? यावर अमोल कोल्हे यांनी सांगितले की, 'हा प्रश्न त्यांना विचारणं जास्त संयुक्तिक आहे. कारण यातील काही उपप्रश्न येतात. १२ जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये लातूर आणि सांगली वगळता जवळपास सगळ्याच इतर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि नेत्यांचे कुटुंबीय सुद्धा घड्याळाचे चिन्ह घेऊन लढले आहेत. अशोक बापू पवारांच्या पत्नी सुजाता पाटील, हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील घड्याळाच्या चिन्हावर लढले. तर या सर्वांना एबी फॉर्म कुणी दिले. आम्हाला कल्पना नाही असे प्रदेशाध्यक्ष म्हणत असतील तर त्यांनी याचेही उत्तर द्यावे की एबी फॉर्मवर प्रदेशाध्यक्षांची सही असते. या नेत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे पक्षात अधिकृत प्रवेश झालेले नाही मग एबी फॉर्म कसे दिले. मग एबी फॉर्म देताना प्रदेशाध्यक्षांनी प्रश्न विचारला नसेल का? असे कोडं लोकांना पडते. जुन्नर तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाची मतं विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमदेवाराला होती. अजित पवारांच्या पक्षाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. सगळेच्या सगळे उमेदवार जर घड्याळाचा चिन्हावर लढत असतील मग हे कोडं पडलं नसेल का. जर मग कुणी म्हणतं या गोष्टीची कल्पना नाही यावर लोकांनी कसा विश्वास ठेवायचा हा सुद्धा मोठा प्रश्न यातून तयार होतो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com