Eknath shinde and Devendra Fadnavis  saam tv
महाराष्ट्र

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील तब्बल २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडका फडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील तब्बल २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडका फडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पोलीस उपायुक्त तसेच पोलीस अधीक्षकांचा समावेश आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक शहरातील पोलिस (Police) अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशा चर्चा सुरु होत्या. अखेर आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

आज म्हणजेच गुरूवारी सायंकाळी या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. शिंदे फडणवीस सरकारने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचाही समावेश आहे.

कोणकोणत्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

धनंजय आर कुलकर्णी : पदस्थापनेच्या प्रतीक्षेत - पोलीस अधीक्षक, रत्नागिरी

पवन बनसोड : अपर पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रा- पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग

बसवराज तेली : पोलीस उप आयुक्त नागपूर शहर- पोलीस अधीक्षक,सांगली

शेख समीर अस्लम : अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली- पोलीस अधीक्षक, सातारा

अंकित गोयल : पोलीस अधीक्षक, गडचिरोली- पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

शिरीष एल सरदेशपांडे : पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक- पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण

राकेश ओला : पोलीस अधीक्षक, लाचलुतपत प्रतिबंधक विभाग, नागपूर- पोलीस अधीक्षक, अहमदनगर

एम. राजकुमार : पोलीस अधीक्षक लोहमार्ग, नागपूर- पोलीस अधीक्षक, जळगाव

रागसुधा आर. : समादेशक , राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ३ जालना- पोलीस अधीक्षक, परभणी

संदीप सिंह गिल : समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १२ हिंगोली - पोलीस अधीक्षक, हिंगोली

श्रीकृ्ष्ण कोकाटे : पोलीस उप आयुक्त बृहन्मुंबई- पोलीस अधीक्षक, नांदेड

सोमय विनायक मुंडे : अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली - पोलीस अधीक्षक- लातूर

सारंग डी आवाड : पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर- पोलीस अधीक्षक, बुलढाणा

गौरव सिंह : पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक- पोलीस अधीक्षक, यवतमाळ

संदीप घुगे : समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ११ नवी मुंबई - पोलीस अधीक्षक, अकोला

रवींद्रसिंग एस. परदेशी : उप आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई- पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

नुरुल हसन : पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर- पोलीस अधीक्षक, वर्धा

निखील पिंगळे : पोलीस अधीक्षक, लातूर- पोलीस अधीक्षक, गोंदिया

निलोत्पल : पोलीस उप आयुक्त बृहन्मुंबई- पोलीस अधीक्षक, गडचिरोली

संजय ए बारकुंड : पोलीस उप आयुक्त, नाशिक शहर- पोलीस अधीक्षक, धुळे

श्रीकांत परोपकारी : प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर- पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर

सचिन अशोक पाटील : पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण- पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद

लक्ष्मीकांत पाटील : पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर- प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर

पराग शाम मणेरे : पदस्थापनेच्या प्रतीक्षेत- उप आयुक्त विशेष सुरक्षा विभाग (व्हीआयपी सुरक्षा) मुंबई

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT