Amol kale, mca new president
Amol kale, mca new presidentsaam tv

Breaking : शेलार-पवार पॅनलचे अमोल काळे MCA चे नवे अध्यक्ष, संदीप पाटील यांचा पराभव

क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
Published on

मुंबई : क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे विजयी झाले आहेत. एमसीएच्या निवडणुकीत काळे यांच्या विरोधात उभे राहिलेले माजी क्रिकेटर संदीप पाटील यांचा पराभव झाला आहे. अमोल काळे यांना पवार-शेलार गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती. क्रिकेटर विरुद्ध राजकारणी असा सामना गेल्या काही दिवसांपासून रंगला होता. अमोल काळे यांना १८१ मतं मिळाली आहेत. तर संदीप पाटील यांना १५८ मतं मिळाली आहेत.

Amol kale, mca new president
Edible Oil Price : दिवाळीच्या तोंडावर महागाईचा भडका; खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ

निवडणुकीचा निकाल लागला आहे. आमचे सहकारी विजयी झाले आहेत. मी शरद पवार आणि आशिष शेलार यांचे आभार मानतो. तसंच ज्यांनी मला मतदान केलं त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. ही निवडणूक क्रिडा विषयक होती. यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नव्हतं, अशी प्रतिक्रिया अमोल काळे यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली आहे. दरम्यान, या निवडणुकीत ३४३ मतदारांनी मतदान केलं. या निवडणुकीत एकूण ९६ टक्के मतदान झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com