BJP vs NCP : "बावनकुळेंना सतत झटके येतात, त्यांना कुणीतरी रुग्णालयात घेऊन जा"

राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे टीकास्त्र सोडलंय.
Chandrashekhar Bawankule vs  Rupali Thombare
Chandrashekhar Bawankule vs Rupali Thombare Saam TV

Chandrashekhar Bawankule vs Rupali Thombare : राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे टीकास्त्र सोडलंय. चंद्रशेखर बावनकुळे यांना तातडीने कुणीतरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन जा, त्यांना राष्ट्रवादीच्या विरोधात सातत्याने झटके येत असतात, अशी टीका रुपाली ठोबरे यांनी केली आहे.

Chandrashekhar Bawankule vs  Rupali Thombare
Breaking : शेलार-पवार पॅनलचे अमोल काळे MCA चे नवे अध्यक्ष, संदीप पाटील यांचा पराभव

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविषयी बोलताना, '२०२४ निवडणुकीत बारामतीतच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचं घड्याळ बंद पाडू', असं आव्हान दिलं होतं. त्यांच्या या आव्हानाला आता रुपाली ठोबरे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

काय म्हणाल्या रुपाली ठोंबरे?

चंद्रशेखर बावनकुळे यांना तातडीने कुणीतरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन जा, त्यांना राष्ट्रवादीच्या विरोधात सातत्याने झटके येत असतात, झटके येण्याचं लक्षण असल्यामुळे त्यांना त्वरित उपचाराची गरज आहे, अशी टीका रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले होते?

काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविषयी बोलताना, '२०२४ निवडणुकीत बारामतीतच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचं घड्याळ बंद पाडू', असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर आजही पुण्यात बोलताना २०२४ मध्ये राष्ट्रवादी अर्धी सुद्धा राहणार नाही, असं विधान बावनकुळे यांनी केलं. दरम्यान, बावनकुळे यांच्या या विधानाचा रुपाली ठोंबरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com