Solapur Politics News Saam TV
महाराष्ट्र

Solapur News: सोलापुरात अजितदादांची ताकद वाढली; ४ बड्या नेत्यांनी सोडली शरद पवारांची साथ

Satish Daud

Solapur Politics News

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर आता राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ३१ जानेवारीपर्यंत यावर निकाल देण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच शरद पवार गटाला एक मोठा धक्का बसला आहे. सोलापुरातील ४ खंदे समर्थक अजित पवार गटात सामील होणार असल्याची माहिती आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोलापूर महापालिकेतील माजी गटनेते आनंद चंदनशिवे, माजी गटनेते तौफिक शेख, नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेवक इरफान शेख यांनी मंगळवारी मुंबईत येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली.

या भेटीनंतर चारही माजी सेवकांनी अजित पवार गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. या महिनाअखेरीस उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत सोलापुरात हा पक्षप्रवेश सोहळा पडणार पार असल्याची माहिती आहे.

विशेष बाब म्हणजे, शरद पवार लवकरच सोलापूरचा दौरा करणार आहे. मात्र, या दौऱ्याआधीच ४ माजी नगरसेवकांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. ऐन लोकसभा निवडणुका तोंडावर असताना ४ खंदे समर्थक अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याने शरद पवार गटाचं टेन्शन वाढलं आहे.

यातील तौफिक शेख यांनी ‘एमआयएम’च्या उमेदवारीवर सोलापूर शहरमध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती. तर, आनंद चंदनशिवे हे तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले असून त्यांची शहरात ताकद आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT