Jalgaon Politics: गिरीश महाजनांची किंमत एक रुपयांची; एकनाथ खडसेंनी कोर्टात दाखल केला अब्रुनुकसानीचा दावा

Eknath Khadse Latest news: मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी खोटे आरोप आणि बदनामी केल्याचा आरोप करत एकनाथ खडसेंनी कोर्टात त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
Eknath khadse and girish mahajan
Eknath khadse and girish mahajan Saam tv
Published On

संजय महाजन, जळगाव

Jalgoan Political News:

मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी खोटे आरोप आणि बदनामी केल्याचा आरोप करत एकनाथ खडसेंनी कोर्टात त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. एकनाथ खडसे यांनी जळगाव न्यायालयात गिरीश महाजन यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करत एक रुपयाच्या नुकसान भरपाईचा दावा केला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गु्न्हा दाखल झाल्यानंतर जळगावमधील राजकारण तापलं आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री गिरीश महाजन यांनी खोटे आरोप आणि बदनामी केल्याचा आरोप करत एकनाथ खडसेंनी कोर्टात धाव घेतली आहे. एकनाथ खडसेंनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Eknath khadse and girish mahajan
Kunbi Certificate: कुणबी प्रमाणपत्रासाठी देवस्थानामधील जुने पुरावे राहतील ग्राह्य : बच्चू कडू

एकनाथ खडसेंनी जळगावच्या न्यायालयात महाजन यांच्या विरोधात एक रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा दाखल केला आहे. कोर्टात दावा दाखल केल्यानंतर महाजन यांची किंमत आपल्या दृष्टीने एक रुपयांचे असल्याचा टोला लगावत सत्य काय ते न्यायालयात येऊन सांगावं, असं त्यांनी म्हटलं आहे.

Eknath khadse and girish mahajan
Lok Sabha Election: सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघातून लोकसभा लढवणार; अजित पवार काय भूमिका घेणार?

खडसेंनी गिरीश महाजनांवर काय आरोप केले आहेत?

'सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टीने हृदयविकाराचे नाटक करत असल्याचा तसेच मुलाच्या मृत्यूबाबत संशयास्पद वक्तव्य करून समाजामध्ये माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर केला आहे. तर गिरीश महाजन यांची किंमत आपल्या दृष्टीने एक रुपयांची असून कोर्टात येऊन सत्य सांगावं, असं खडसे म्हणाले आहेत.

Eknath khadse and girish mahajan
Uddhav Thackeray: 'एकही पोलीस न घेता यावं; शिवसेना कोणाची सांगावं...' उद्धव ठाकरेंचे CM शिंदे, नार्वेकरांना थेट आव्हान!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com