विनय म्हात्रे, मुंबई|ता. १६ जानेवारी २०२४
शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर ठाकरे गटाने थेट जनतेच्या कोर्टात उतरण्याची तयारी केली आहे. मुंबईतील वरळी एनएससीआय डोम येथे ठाकरे गटाची महापत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेत नार्वेकरांच्या निकालाची पोलखोल केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनीही नार्वेकरांवर जोरदार हल्लाबोल केला.
काय म्हणालेत उद्धव ठाकरे?
"लबाडाने नाही लवादाने जो निर्णय दिलाय त्याच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालायत गेलोय. सरकार कोणाचे ही असो पण सत्ता ही जनतेची असायला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. माझं तर आव्हान आहे नार्वेकर आणि मिंद्यांनी यावं. एकही पोलीस न घेता यावं आणि तिथे शिवसेना कुणाची हे सांगावं मग जनता ठरवेल कुणाला पुरावा, कुणाला गाडावा आणि कुणाला तुडवावा," असे थेट आव्हान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले.
"मला तरं वाटत आपण निवडणूक आयोगावर खटला केला पाहिजे. निवडणुक आयोगात आपण १९ लाख ४१ हजार प्रतिज्ञापत्रे सादर केली होती. मगं निवडणूक आयोग त्याच्या गाद्या करुन झोपले होते का? अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. तसेच एकतर ती प्रतिज्ञापत्रे स्विकारा किंवा आमचे पैसेतरी परत करा," अशी कोपरखळीही ठाकरेंनी यावेळी मारली.
मी पक्षप्रमुख नाही तर २०१९ साली अमित शाह (Amit Shah) युतीची चर्चा करण्यासाठी माझ्याकडे कशासाठी आले? फडणवीसांनी पाच वर्ष मुख्यमंत्रीपद घेतले, ते कुणाच्या पाठिंब्यावर? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच अब बाळासाहेब नहीं रहे, तो अब मैं उद्धव जी से बात करता हूँ, असे नरेंद्र मोदी काय म्हणाले, असा सवालही ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.