Bhusawal APMC Result Saam Tv
महाराष्ट्र

Bhusawal APMC Result: एकनाथ खडसेंना धक्का; भुसावळ बाजार समितीत भाजप-शिंदे गटाची एक हाती सत्ता

भाजप शिंदे गटाचा बाजार समिती निवडणुकांमध्ये माहविकास आघाडीला मोठा झटका

संजय महाजन

Bhusawal Bazar Samiti Election Result: भुसावळ बाजार समितीत आमदार संजय सावकारे यांच्या भाजप शिंदे गटाचे शेतकरी विकास पॅनल 18 पैकी पंधरा जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवली. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या शेतकरी सहकार पॅनल ला केवळ तीन जागांवर विजय झाला असून त्यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे नेते एकनाथ खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. (Latest Marathi News)

भुसावळ (Bhusawal) बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. भुसावळ बाजार समिती याठिकाणी भाजप शिंदे गटाचे शेतकरी विकास पॅनल तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे शेतकरी (Farmer) सहकारी पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होते. दीड तासातच याठिकाणची मतमोजणी संपली आहे.

यात 18 पैकी जागांवर 15 जागांवर भाजपचे (BJP) आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात भाजप शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहे. तर महाविकास आघाडीचे शेतकरी सहकारी पॅनलचे केवळ तीन जागांवर उमेदवार विजयी झाला असून महाविकास आघाडीच्या पॅनलचा या ठिकाणी पराभव झाला आहे.

भाजप शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व हे भाजपचे आमदार संजय सावकारे तर महाविकास आघाडीचे पॅनलचे नेतृत्व भुसावळ बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी तसेच एकनाथ खडसे करत होते . त्यामुळे भाजप शिंदे गटाने जळगाव जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये पहिलाच मोठा झटका दिला आहे.

भाजप शिंदे गटाच्या पॅनलचे नेतृत्व करत असलेले भाजपचे आमदार संजय सावकारे हे एकनाथ खडसे यांच्या कट्टर समर्थक होते. या कट्टर समर्थकाने भुसावळ बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवत एकनाथ खडसेंना मोठा धक्का दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT