
Delhi News: दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांसंदर्भात दोन एफआयआर नोंदवले. महिला कुस्तीपटूंकडून करण्यात आलेल्या तक्रारींच्या आधारे कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
मी निर्दोष आहे आणि तपासाला सामोरे जाण्यास तयार आहे. मी तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो असे WFI प्रमुख आणि भाजप (BJP) खासदार ब्रिजभूषण सिंह म्हणाले.
यासोबतच या संपामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोपही ब्रिजभूषण सिंह यांनी केला आहे. ब्रिजभूषण म्हणाले की, एफआयआर दाखल करण्याबाबत चर्चा झाली आहे. एफआयआरची (Fir) प्रत सध्या माझ्याकडे नाही. पण एफआयआर झालीच असेल. मला त्यात काही गैर दिसत नाही. माझा दिल्ली पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. माझी काही तक्रार नाही. मी पूर्णपणे निर्दोष आहे. मी या आरोपांना सामोरे जाण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया ब्रिजभूषण सिंह दिली आहे. (Delhi News)
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी देशातील दिग्गज कुस्तीपटू दिल्लीत धरणे आंदोलन सुरु आहे. त्यांच्या या लढ्याला अनेक राजकीय पक्षांकडूनही पाठिंबा मिळत आहे.
प्रियंका गांधी यांनी घेतली महिला पहिलवानांची भेट
या आंदोलकांशी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भेट घेतली. यावेळी प्रियंका गांधी यांनी विनेश, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्याशी बातचीत केली. प्रियंका गांधी जवळ जवळ अर्धा तास या आंदोलकांसोबत आंदोलनाच्या ठिकाणी बसून होत्या.
प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) म्हणाल्या, 'दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, ज्याची प्रत अद्याप मिळालेली नाही, जेणेकरून त्यात कोणत्या कलमांचा समावेश आहे हे कळू शकेल. एफआयआर नोंदवला असेल तर दाखवावा. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. ते पदावर असताना चौकशी करणे शक्य नाही, त्यामुळे त्यांनी आधी राजीनामा द्यावा. (Delhi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.