Sanjay Raut vs CM Shinde : मुख्यमंत्री डोळे झाक करत आहेत...; बारसू प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवर संजय राऊतांची टीका

Barsu Refinery Project :तसेच बारसू परिसरात झालेल्या आंदोलनात 164 महिला आणि 37 पुरुष आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
Eknath Shinde And sanjay raut
Eknath Shinde And sanjay raut saam tv

Political News : रत्नागिरीमधील बारसू येथील रिफानरी विरोधात सुरू असलेलं आंदोलन काल मोठ्या प्रमाणावर चिघळलं. आंदोलन करत असलेल्या नागरिकांचा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच बारसू परिसरात झालेल्या आंदोलनात 164 महिला आणि 37 पुरुष आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र या सर्व प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठलाही लाठीचार्ज झाला नसल्याचं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता संजय राऊतांनी मोठी टीका केली आहे. (Barsu Refinery Project)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काल म्हणाले की, मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे बारसूच्या आंदोलकांवर अजिबात लाठीचार्ज झाला नाही. सर्व काही शांतीने सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचं मला मोठं आश्चर्य वाटतं. काल येथे महिला, तरुण मुलं तसेच वृद्ध व्यक्तींवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. आता मुख्यमंत्र्यांना अधिकारी खोटी माहिती देतात का? काही झालं नाही असं सांगतात. एक तर मुख्यमंत्री डोळे झाक करत आहेत किंवा मुख्यमंत्र्यांची प्रशासनावरती अजिबात पकड नाही, असा टोला राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर लगावला आहे.

Eknath Shinde And sanjay raut
Uttar Pradesh Crime : बाप झाला हैवान! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या तोंडात केमिकल ओतलं, गळा दाबला अन्...; पोटच्या मुलीसोबत असं का केलं?

पुढे अधिकाऱ्यांच्या माहितीवर बोलताना राऊत म्हणाले की, अधिकारी त्यांना फसवत आहेत. खोटी माहिती देत आहेत. जर अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देत असतील तर त्यांना ताबडतोब बदललं पाहिजे. काही झालं तरी त्यांना खेचून बाहेर काढलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

मी आदेश दिलाच नाही असं मुख्यमंत्री बोलतात. प्राण गेला तरी चालेल आम्ही जमीन सोडणार नाही असं स्थानिक बोलतात. यावर मुख्यमंत्री म्हणतात की,70 टक्के नागरिक आमच्या बाजूने आहेत. कसला सर्वे केलाय लोक इथं मारण्यासाठी रस्त्यावर येत आहेत का? असा सवाल राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर उपस्थित केलाय.

Eknath Shinde And sanjay raut
Maharashtra Political News: ठाकरे गटाचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर; पदाधिकाऱ्याचे बड्या नेत्यावर गंभीर आरोप, उद्धव ठाकरेंना पत्र

समन्वय कोणाशीच नाही

सध्याच्या सरकारचा कोणाशी कसलाही समन्वय नाही. एका इस्लामिक रिफायनरीसाठी रत्नागिरीत मराठी माणसांना भूमिपुत्रांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. बारसू प्रकरणामध्ये जी भूमिका उद्धव ठाकरेंची आहे तिच भूमिका पक्षाची देखील आहे. आमचे सगळे आमदार खासदार पदाधिकारी हे पक्षाच्या निर्णयाला बांधील आहेत. आमच्यात मतमतांतर नाही जर असेल तर आम्ही थेट पक्षप्रमुखांचे चर्चा करतो, असं संजय राऊत म्हणाले.

मुंबईत होणाऱ्या वज्रमुठ सभेसाठी आज महाविकास आघाडीची होणार एकत्रित बैठक

1 मे रोजी महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेतील मुद्द्यांसाठी एकत्रित बैठक होत आहे. सभेसाठी कोणते नेत्यांची भाषणे असणार आहेत आणि कोणते नेते उपस्थित असणार आहेत त्या संदर्भात ही एकत्रित बैठक होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com