Jitendra Shelke accident  Saam
महाराष्ट्र

मोठी बातमी! भोंदू खरातच्या निकटवर्तीयाचा मृत्यू, समृद्धीवर कारचा चक्काचूर, नेमकं घडलं काय?

Jitendra Shelke accident : अशोक खरात यांचे निकटवर्ती जितेंद्र शेळके यांचा शिर्डीत ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. अपघातानंतर चालक फरार झाल्याने हा अपघात की घातपात, याबाबत संशय व्यक्त केला जात असून पोलिस तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

सचिन बनसोडे, शिर्डी प्रतिनिधी

Jitendra Shelke Shirdi accident news : अशोक खरात याचा निकटवर्ती असलेले जितेंद्र शेळके यांचे अपघाती निधन झाले आहे. शिर्डीजवळ समृद्धी महामार्गावर अपघातात त्यांचं निधन झाले आहे. ट्रकने शेळके यांच्या गाडीला जोरात धडक दिली, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला आहे. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात, याची चर्चा सुरू झाली आहे. (Ashok Kharat aide death mystery truck hit case)

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर संभाजीनगरहून शिर्डीकडे येत असताना धोत्रे गावाजवळ शेळके यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे खरात प्रकरणाचा काही संबंध आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. शेळके हे अशोक खरात याचे निकटवर्तीय होते. खरातला अटक केल्यानंतर शेळके प्रचंड तणावात असल्याचीही माहिती मिळाली आहे.

संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात असताना धोत्रे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र शेळके हे आपल्या कुटुंबासह कारने शिर्डीच्या दिशेने निघाले होते. धोत्रे गावाजवळ उभ्या असलेल्या एका कंटेनरला त्यांच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कार थेट कंटेनरच्या खालच्या बाजूला घुसली.

या अपघातात जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, शेळके यांची पत्नी बराच वेळ गाडीतच अडकून पडल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. दोघांवरही सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

जितेंद्र शेळके हे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात होते. खरात यांच्या 'शिवनिका ट्रस्ट'चे ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते, तसेच खरात यांच्या लॉन्समध्येही त्यांची भागीदारी होती, असे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरात याला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके मानसिक तणावाखाली होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महिलेने घेतला तरूणाच्या प्रायव्हेट पार्टचा चावा; घरी पोहोचताच व्यक्तीचा मृत्यू

Maharashtra News Live Update: विरारमध्ये धावत्या गाडीला लागली आग

५ कोटींच्या MDMA गोळ्या जप्त, महिला सप्लायर अटकेत; मुंबईत खळबळ

Irregular Menstruation: महिन्यातून दोनवेळा मासिक पाळी का येते? तज्ज्ञांनी सांगितलं किती धोकादायक असू शकते परिस्थिती

भाजपचा अनुभवी चेहरा हरपला; PM मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली, राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT