bhendwal khamgoan road to reconstruct demands villagers  saam tv
महाराष्ट्र

Buldhana : पुलाचा खड्डा बनलाय मृत्युचा सापळा, भेंडवळ- खामगाव रस्त्यावरील स्थिती; ग्रामस्थ आंदाेलनाच्या तयारीत

या खड्ड्यात दुचाकी व चारचाकी स्वारांचे अनेक अपघात झाले आहेत. या अपघातात 5 ते 6 जण दगावलेत. अनेकाना अपंगत्व आले आहे.

संजय जाधव

Buldhana News :

बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ ते खामगाव रस्त्यावर पुलाचा खड्डा बनल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. हा खड्डा म्हणजे मृत्युचा सापळा असल्याचे म्हटले जात आहे. या ठिकाणी दररोज अपघात घडत आहे. यामुळे आता ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या 4 वर्षांपासून खामगाव ते चांगेफळ रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरु आहे. हे काम अद्याप पूर्ण झाले नाही. ठिकठिकाणी पुलाचे अर्धवट काम झाले आहे. या ठिकाणी सध्या काम बंद आहे. संग्रामपूर ते खामगाव असा हा रस्ता असून भाजप आमदार संजय कुटे यांचे पूर्णतः याकडे दुर्लक्ष झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

भेंडवळ नजीक या रस्त्यावरील पुलाचे काम अर्धवट ठेवून तिथे मोठा खड्डा तसाच ठेवला आहे. त्या खड्ड्यात दुचाकी व चारचाकी स्वार याचे अनेक अपघात झाले आहेत. या अपघातात 5 ते 6 जण दगावलेत तसेच अनेकाना अपंगत्व आले आहे. (Maharashtra News)

ग्रामस्थांनी बऱ्याच वेळा निवेदने दिली मात्र त्याच्याकडे संबधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. आता जर दोन दिवसात या रस्त्यावरील पुलाचे अर्धवट कामे पूर्ण केली नाही तर रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT