Chain Snatching Case
Chain Snatching Case Saam tv
महाराष्ट्र

Mira Bhayandar : रिक्षातून येत वृध्द महिलेची चैन स्नॅचिंग; २ तासात आरोपी ताब्यात

चेतन इंगळे

भाईंदर : भाईंदर पूर्वच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात व्यक्तीने वृध्द महिलेची चैन स्नॅचिंग केल्याची घटना घडली होती. नवघर पोलिसांनी (Police) घटनेची माहिती घेत २ तासातच आरोपीचा शोध घेतला असून गुन्हा (Bhayandar) उघडकीस आणला आहे. सदरची कामगिरी नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे. (Tajya Batmya)

नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मालती रामतेज पाल (वय ५३ वर्षे) या १४ डिसेंबरला सायंकाळी राधाकृष्ण मंदिर भाईंदर पूर्व येथे पायी जात होत्या. या दरम्यान बी.पी. रोड लाकडी वखारीजवळ भाईंदर पूर्व येथे आल्या असता कोणीतरी अनोळखी व्यक्तीने रिक्षातुन येवुन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे पेंन्डट असलेली अंदाजे १.५ तोळे वजनाची सोन्याची चैन (Chain Snatching) खेचुन घेऊन गेला होता. याबाबत नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सीसीटीव्ही फुटेजवरून चोरटा ताब्यात 

सदरचा गुन्हा दाखल झायननंतर घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक रिक्षाचालक फिर्यादीच्या गळ्यातील चैन खेचुन गोडदेव नाका बाजुकडे पळून जात असतांना दिसुन आला. सदर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या रिक्षाच्या क्रमांकावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपीवर या अगोदर नवघर पोलीस ठाणे, भाईंदर पोलीस ठाणे, नवघर पोलीस ठाणे गुन्हे दाखल आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manisha Koirala : "सर्वच स्वप्ने पूर्ण होत नाहीत…"; मनीषा कोईरालाने मूल दत्तक न घेण्याचं सांगितलं कारण

Today's Marathi News Live : ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेऐवजी भाजपचा प्रचार?

Unseasonal Rain : अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा तडाखा; १०० पोपटांचा मृत्यू, काही पोपट जखमी

Look Younger : सर्जरी न करता वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही दिसाल तरुण; फॉलो करा या टिप्स

Benifits of Goatmilk: शेळीचे दूध प्या आणि निरोगी राहा

SCROLL FOR NEXT