Manmad News : अन्यथा शेतकरी घेणार जलसामाधी; पालखेड आवर्तनाचे पाणी मिळण्यासाठी शेतकरी आक्रमक

Nashik News : नाशिकच्या येवला तालुक्यातील पूर्व भागातील रस्ते सुरेगाव, देवठाण, गवंडगाव यासह परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे
Palkhed Dam Nashik
Palkhed Dam NashikSaam tv

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : पालखेड डाव्या कालव्याला पाणी चालू असून या आवर्तनाचे पाणी मिळावे; या मागणीसाठी येथील स्थानिक शेतकरी (Farmer) आक्रमक झाले आहेत. पालखेड डाव्या कालव्याचे पाणी न (Manmad) मिळाल्यास या कालव्यातच जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. (Latest Marathi News)

Palkhed Dam Nashik
Solapur Bajar Samiti : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठी आवक; दोन दिवस लिलाव राहणार बंद

नाशिकच्या येवला तालुक्यातील पूर्व भागातील रस्ते सुरेगाव, देवठाण, गवंडगाव यासह परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. शेतातील पिकांना कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या आवर्तनाचे पाणी देता येणे शक्य होत असते. परंतु येवला तालुक्यातील काही गावांना पाणी मिळत नाही. दरम्यान सध्या पालखेड डाव्या कालव्याला पाणी चालू असून या आवर्तनाचे पाणी मिळावे; या मागणीसाठी येथील स्थानिक शेतकरी आक्रमक झाले आहेत.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Palkhed Dam Nashik
Sangli Jail : कारागृहाच्या तटबंदीवरील तारांमध्ये आता विजेचा प्रवाह; स्पर्श होताच वाजणार ‘अलार्म’

यापूर्वीही रास्तारोको आंदोलन 

पाण्यासाठी येथील शेतकऱ्यांना नेहमीच तीव्र आंदोलन करण्याची वेळ येत असून या अगोदर देखील पाण्यासाठी रस्ता रोको करण्यात आला होता. यावेळी अनेकांवर गुन्हे देखील दाखल झाले होते. तरी या आवर्तनाचे पाणी मिळावे; अन्यथा शेतकरी उग्र होत जलसमाधी आंदोलन करतील असा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com