Bharat Gogawale saam tv
महाराष्ट्र

Bharat Gogawale : मंत्र्याच्या मुलाच्या अडचणी वाढल्या, अटकपूर्व जामीन ३ वेळा फेटाळला, राऊत म्हणाले शिंदेसेनेचा नेता फरार

Mahad municipal election violence case news : महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाचा अटकपूर्व जामीन तीन वेळा फेटाळला. संजय राऊतांचा फडणवीसांवर गंभीर आरोप केलाय.

Namdeo Kumbhar

सचिन कदम, साम टीव्ही प्रतिनिधी

Bharat Gogawale son anticipatory bail rejected : महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाच्या अडचणीत वाढ झाली आहे. निवडणुकीतील राड्याप्रकरणी कोर्टाने ३ वेळा त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे म्हटले जातेय. ठाकरेंच्या शिसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले फरार असल्याचा दावा राऊत यांनी केलाय. कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर विकास गोगावले फरार असल्याचे राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.

महाड नगरपालिका निवडणूक काळात मतदानाच्या दिवशी प्रभाग क्रमांक २ मध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी शिवसेनेचे युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांना दणका बसलाय. माणगाव कोर्टाने २ वेळ आणि मुंबई कोर्टाने १ वेळा त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे विकास गोगावले यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

यावरून ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय. जामीन फेटाळल्यानंतरही गोगावलेंचा मुलगा फरार आहे.मंत्र्यांच्या मुलाला फडणवीसांचं अभय आहे असा आरोपही त्यांनी केलाय. महाड नगरपालिका निवडणूक मतदानाच्या दिवशी झालेल्या या राडाप्रकरणी विकास गोगावले यांच्यासह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर परस्पर विरोधी मारहाण, वाहनांची तोडफोड, शास्त्र बाळगणे अशा गुन्ह्याखाली महाड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

विकास गोगावले यांनी माणगाव कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामीन मागितला होता. मात्र कोर्टाने हा अर्ज फेटाळला त्यानंतर विकास गोगावले यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याची माहिती मिळत आहे . राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे सुद्धा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळले आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे बंधू हणमंत जगताप आणि सुशांत जाबरे यांच्यासह कार्यकर्त्यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning heart attack risk: सकाळच्या वेळी हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त का असतो? समजून घ्या यामागील कारण

इंजिन सोडून, धनुष्यभाण हाती, ऐन निवडणुकीत राज ठाकरेंना मोठा धक्का; प्रकाश महाजनांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश|VIDEO

Orange Benefits: थंडीत आंबट-गोड संत्री खल्ल्याने कोणते आरोग्यदायी फायदे मिळतात

Maharashtra Live News Update: उबाठा गटाला महापालिका निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का!

खोपोलीत नगरसेविकेच्या पतीची हत्या, भरत गोगावलेंचा राष्ट्रवादीवर आरोप|VIDEO

SCROLL FOR NEXT