Bhandara Truck-Bike Accident  Saam TV
महाराष्ट्र

Bhandara Accident: भरधाव ट्रकने दुचाकीला उडवलं; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर

Bhandara Accident News: भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या घटनेत दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

Satish Daud

शुभम देशमुख, साम टीव्ही भंडारा

Bhandara Truck-Bike Accident

भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या घटनेत दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना तुमसर तालुक्यातील चिंचोली-पवनारा मार्गावर मंगळवारी (ता. २३) रात्रीच्या सुमारास घडली आहे.

विजय धुर्वे (रा. चिखला मध्यप्रदेश) तुफान उईके (रा. टेकाडी सुकळी मध्यप्रदेश) असे अपघातात (Accident) मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव आहे. तर समीर वट्टी (रा. चिखला मध्यप्रदेश) असे गंभीर जखमी असलेल्या तरुणांचे नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चालक विजय धुर्वे हा नागपूरवरुन आपले काम आटोपून आपल्या दोन मित्रांसह ट्रिपल सिट चिखला मध्यप्रदेश स्वगावी जात होता. तुमसर-गोबरवाही मार्गावरील चिचोली-पवनारा येथे दुचाकी आली असता, समोरुन भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता, की ट्रकने दुचाकीला दूरपर्यंत फरफटत नेले. या घटनेत दुचाकी चालकासह मागे बसलेला व्यक्ती जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच तुमसर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबार बाजार समितीत टोमॅटोची आवक घटल्याने भाव दुप्पट

Akola : पाण्यात पडलेल्या बकरीला वाचविले पण जीव गमावला; नदीतील डबक्यात बुडून एकाचा मृत्यू

Vasai - Virar MSRTC : कर्मचाऱ्यांना पगार नाही, वसई-विरार मनपाची बससेवा ठप्प; ऐन गणेशोत्सवात नागरिकांना मनस्ताप

Ladki Bahin Yojana: लाडकींमुळे आमदारांचा निधी रखडला? ९ महिन्यांपासून १ रुपयाही मिळाला नाही; मंत्रालयात हेलपाटे

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात वाढ; १७०० कोटी मंजूर

SCROLL FOR NEXT