Bhandara Crime Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Crime : प्रशिक्षकाकडून तरुणीकडे शरीरसुखाची मागणी; पोलीस भरती प्रशिक्षण अकॅडमीतील प्रकार, प्रशिक्षक ताब्यात

Bhandara News : पोलीस भरतीचे स्वप्न घेऊन तरुणीने अकॅडमी जॉईन केली. मात्र प्रशिक्षण देणाऱ्याची तरुणीवर वाईट नजर होती. यातून त्याने शरीरसुखाची मागणी केली. याबाबत विचारणा करणाऱ्या तरुणीच्या मित्राला देखील शिवीगाळ केली 

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: महिला, तरुणींची छेळछाळ करण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. यातच भंडाऱ्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीच्या प्रशिक्षकाकडून अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केली आहे. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर अड्याळ पोलिसांनी प्रशिक्षकाला अटक केली आहे. 

तरुणी- महिलांवरील अत्याचार तसेच छेळछाळ करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे तरुणी सुरक्षित नाहीत. यातच भंडारा शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालविणाऱ्या एका ॲकॅडमीच्या प्रशिक्षकाकडून त्याच्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्या एका तरुणीला शरीर सुखाची मागणी केली. एवढ्यावरचं हा ॲकॅडमीचा शिक्षक थांबता नाही; तर त्याने तरुणीच्या मित्राला जातीवाचक शिवीगाळ केली. 

प्रशिक्षकाला घेतले ताब्यात 

नितेश हिवरकर (वय ३९, रा. सोनेगाव ठाणे ता. पवनी, जि भंडारा) असं आरोपी प्रशिक्षकाचं नाव आहे. हा गंभीर प्रकार भंडाऱ्याच्या अड्याळ इथं घडला असून याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी तरुणीच्या मित्राच्या तक्रारीवरून ॲकॅडमीच्या प्रशिक्षकाविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करून प्रशिक्षक निलेश हिवरकर याला पोलिसांनी रात्री अटक केली आहे. 

चोरीचे सोने विकायला आलेल्या दोघांना अटक
सोलापूर : चोरी केलेले सोने विकायला आलेल्या दोन संशयितांना सोलापूर एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ९१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बंडू पवार आणि उमेश काळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांनी सोलापूर शहरातील विनायक नगर आणि बाळकोटे नगर येथे घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Local Body Elections: निवडणुका नेमक्या कधी होणार? महायुतीच्या नेत्याने थेट तारखाच सांगितल्या

Bigg Boss 19 : प्रणित मोरे बिग बॉसच्या घराबाहेर का गेला? नेमका कोणता आजार झाला होता, माहिती आली समोर

Crime News : धाराशीवमध्ये रक्तरंजित थरार! टपरी चालकाची दिवसाढवळ्या हत्या, धक्कादायक कारण

Maharashtra Live News Update : मनोज जरांगे पाटील डॉक्टर निर्भया यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी दाखल.

Kartik Aaryan : इच्छाधारी नागाच्या रुपात कार्तिक आर्यन; नवीन चित्रपटाचे शूटिंग सुरू, रिलीज डेट काय?

SCROLL FOR NEXT