Water Crisis : भर पावसाळ्यात पाणी टंचाई, महिलांना करावी लागतेय भटकंती; ६ महिन्यापासून गावात समस्या

Buldhana News : पाणी पट्टी भरूनही सरपंच व ग्रामसेवक यांचा हेकेखोरपणा सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून धरण उशाशी तर ग्रामस्थ उपाशी अशी अवस्था बुलढाणा जिल्ह्यातील सावरखेड ग्रामस्थांची आहे
Water Crisis
Water CrisisSaam tv
Published On

बुलढाणा : उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण होत असते. उन्हाळ्याचे साधारण दोन- अडीच महिने टंचाईला सामोरे जावे लागल्यानंतर पावसाळ्यात पाण्याची समस्या कमी होत असते. मात्र पावसाळ्याचे दोन महिने उलटून देखील गावात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र चिखली तालुक्यातील सावरखेड गावात पाहण्यास मिळत आहे. यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 

गेल्या दोन महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. शिवाय मे महिन्यातील अवकाळी पावसाने देखील सर्वत्र पाण्याची समस्या दूर झाली होती. दरम्यान चिखली तालुक्यातील काही धरणे, गाव तलाव जेमतेम भरले आहेत. तर पेन टाकळी ओव्हरफ्लो झाले आहे. अश्या अवस्थेत तालुक्यातील सावरखेड हे गाव पेनटाकळी धरण नजिक असताना देखील गावात भर पावसाळ्यात देखील पाणीटंचाई जाणवत आहे. 

Water Crisis
Leopard Attack : शेतात काम करताना बिबट्याचा हल्ला; शेतमजूर वृद्ध महिलेचा मृत्यू

सहा महिन्यांपासुन समस्या कायम 

गेल्या ६ महिन्यापासून मानवी संकटामुळे गावाला पाणी पुरवठा केला जात नसल्याने ग्रामस्थांना भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लगत असल्याचे चित्र समोर आले आहे. पाणीपट्टी कर भरला असून घरपट्टी कर काही जणांचे राहिले आहे. या कारणाने सरपंच व ग्रामसेवकाने पाणी पुरवठा बंद केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. अश्या मुजोर ग्रामसेवक व सरपंचावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करताना दिसत आहे. 

Water Crisis
Nashik Crime : दारु पिण्यास मागितले पैसे; कुटुंबीयांनी नकार दिल्याने राग अनावर, पेट्रोल टाकून राहते घरच पेटविले

विहिरीवरून आणावे लागतेय पाणी 

साधारण १ हजार लोकवस्ती असलेल्या सावरखेड गावात नादुरस्त हातपंप आहे. त्याला पाणी नाही. त्यामुळे कुठेतरी दूरवरील विहिरीचे पाणी आणण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. याबाबत तातडीने जिल्हा प्रशासनाने लक्ष देत ग्रामस्थांना पाणी पुरवठा करावा; अशी मागणी सावरखेड येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com