Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack : घराच्या बाहेर निघताच बिबट्याची झडप; जीव वाचविण्यासाठी केले दोन हात

Bhandara News : घराच्या अंगणात बिबट्याने अचानक झडप घालून जखमी केलं. अचानक झालेल्या हल्ल्याने प्रदीप हे घाबरले. परंतु त्यांनी बिबट्याच्या हल्ल्यातून जखमी झालेल्या इसमांनं स्वतःला सावरत बिबट्याचा प्रतिकार केला

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: पाणी, शिकारीच्या शोधात वन्य प्राणी जंगलातून नागरी वस्तीत येत आहेत. यातून वन्य प्राण्यांकडून हल्ले केले जात असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशीच घटना भंडारा जिल्ह्यात घडली असून घराच्या मागील बाजूस दबा धरून बसलेल्या बिबट्याने एकावर हल्ला केला. यात इसम गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

भंडारा जिल्ह्यातील कोका गावात सदरची घटना आज सकाळी घडली. यात प्रदीप शेंद्रे (वय ३०) असं बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचं नावं आहे. कोका गाव शिवारात बिबट्या शिकारीच्या शोधात आलेला होता. यात बिबट्या प्रदीप शेंद्रे यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या झुडपात दबा धरून बसलेला होता. याच दरम्यान प्रदीप शेंद्रे हे घराच्या बाहेर निघाले असता बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. 

जीव वाचविण्यासाठी बिबट्याशी झुंज 

दरम्यान इसमावर त्याच्या घराच्या अंगणात बिबट्याने अचानक झडप घालून जखमी केलं. अचानक झालेल्या हल्ल्याने प्रदीप हे घाबरले. परंतु त्यांनी बिबट्याच्या हल्ल्यातून जखमी झालेल्या इसमांनं स्वतःला सावरत बिबट्याचा प्रतिकार केला. आपला जीव वाचविण्यासाठी बिबट्याशी झुंज देत जोरात अरोड्या मारत तसेच हातात आलेल्या वस्तुंनी बिबट्याला पळवून लावलं. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात प्रदीप हे गंभीर जखमी झाले आहेत. 

वन विभागाचे कर्मचारी दाखल 

दरम्यान आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी व कुटुंबीयांनी प्रदीप यांना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच भंडारा वन विभागाचे कर्मचारी आणि पीआरटी पथक गावात पोहोचले असून बिबट्याचा शोध घेत आहेत. या घटनेनं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : CM देवेंद्र फडणवीस मराठा नेत्यांना संपवताहेत; मनोज जरांगे यांचा खळबळजनक आरोप, VIDEO

Maharashtra Live News Update: अमरावतीतील भातकुलीत पूर, गावाचा संपर्क तुटला

Dharashiv : महाराजांच्या भक्तीला विरोध केला, पोटच्या पोरानं जन्मदात्या वडिलांना संपवलं; धाराशिवमध्ये खळबळ

Monday Horoscope : सोमवार जाणार ४ राशींसाठी लाभाचा, बढतीचे योग आणि कटकटी मिटणार

Election Commission : मतदारांची वेगळी यादी देणं शक्य होणार नाही; निवडणूक आयोगाचे सुप्रीम कोर्टाला उत्तर, VIDEO

SCROLL FOR NEXT