Bhandara Accident
Bhandara Accident Saam TV
महाराष्ट्र

Accident News : चारचाकी वाहनाची ट्रकला जबर धडक; भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी

अभिजीत घोरमारे

Bhandara Car Accident News : भंडाराकडून लाखनी- साकोलीच्या दिशेने जात असलेल्या चारचाकी वाहनाचे नियंत्रण बिघडल्याने चारचाकीने ट्रकला जबर धडक दिली. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील मुंडीपार गावाजवळ घडली आहे. या भीषण अपघातात 26 वर्षीय महिला आणि चारचाकी चालक जखमी झाली आहे. (Latest Marathi News)

अपघात नेमका कसा झाला?

भंडाराकडून (Bhandara) कडून साकोलीच्या दिशेने जात असलेल्या चारचाकी वाहन चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण बिघडल्याने कार थेट साकोलीच्या दिशेने जात असलेल्या ट्रकला धडकली. धडक इतकी भीषण होती की यात एक महिला आणि कार चालक जखमी झाली आहे. जखमींना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी गस्तीवर असतांना त्यांच्या लक्षात येताच जखमींना पिंपळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले. (Bhandara Accident News)

बोलेरो पिकअप वाहनाचा टायर फुटल्याने गाडी पलटली

दरम्यान, आणखी एका अपघातात भरधाव वेगात बाजारपेठेत भाजीपाला घेऊन जाणारा बोलेरो पिकअप वाहनाचा टायर फुटल्याने वाहन पलटी होऊन अपघात झाला आहे. या अपघातात तिघेजण जखमी झाल्याची समोर आली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी पोलीस स्टेशन हद्दीतील गडेगाव परिसरात घडली आहे.

या घटनेची माहिती महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी या अपघातात जखमी झालेल्या मुजीप शेख (27) मंगेश हटणागर (36) आणि अनिकेत हटणागर यांना बाहेर काढून तातडीने प्रथम उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे दाखल केले. तर महामार्गच्या मधोमध अपघात झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वेळीच स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनास रस्त्याच्या बाजूला करून पुन्हा वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

SCROLL FOR NEXT