CM Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंची 'नायक' स्टाईल कारवाई, रुग्णालयात असुविधा पाहून तात्काळ डॉक्टरांचे निलंबन

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील कळवा येथिल छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय मध्ये भेट दिली.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSAAM TV

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांचे निलंबन केले आहे. यामुळे अनेकांना अनिल कपूरच्या नायक चित्रपटाची आठवण झाली.

नायक चित्रपटात मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत असेलला अनिल कपूर जशी भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करतो तशीच कारवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

CM Eknath Shinde
Video : हार्ट अटॅकनंतर Sushmita Sen आली लाईव्ह, अभिनेत्रीची अवस्था पाहून लोक झाले भावुक

कळवा रुग्णालयातील असुविधा आणि अनास्थेसाठी जबाबदार ठरवत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांना रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

CM Eknath Shinde
Old Pension scheme: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जुन्या पेन्शनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील कळवा येथिल छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय मध्ये भेट दिली. यावेळी अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या कारभाराविषयी तक्रारी केल्या. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अॅक्शन घेत संबंधितांना निलंबित केले आहे.

Edited By - Chandrakant Jagtap

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com