Bhandara Civil Hospital News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : आनंदानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर; प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू

Bhandara आनंदानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर; प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : चार दिवसांपूर्वी साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर एका महिलेचा मृत्यू झाला होता. हि घटना ताजी (Bhandara) असतांनाच पुन्हा जिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर एका महिलेचा २४ तासांतच मृत्यू (Death) झाला. आशा वासनिक असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. (Maharashtra News)

भंडारा तालुक्यातील गोपेवाडा येथील आशा वासनिक यांना दुपारी १ वाजताच्या सुमारास प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूती वेदना वाढल्या होत्या. याच दिवशी शस्त्रक्रिया करण्यात आली. महिलेने सुदृढ बाळाला जन्म दिला. यावेळी दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात येते. सकाळी ७ वाजताच्या सुमारास महिलेची प्रकृती अचानक बिघडू लागली. श्वास घेण्याचा त्रास होत होता. यामुळे तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. 

चार दिवसात दुसरा मृत्यू 

महिलेच्या शरीरातील रक्तातील साखर कमी झाली होती व इतर समस्याही वाढू लागल्या होत्या. कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली. मात्र महिलेची प्रकृती अधिकच ढासळत गेल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. एकीकडे बाळाच्या जन्माची कुटुंबात आनंदाची लाट असताना दुसऱ्या दिवशी महिलेचा मृत्यू झाला. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ऑपरेशन झाल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याची चार दिवसांतील ही दुसरी घटना आहे. वैद्यकीय हलगर्जीपणा आहे की अन्य कारण याचा शोध लागणे अत्यंत गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amarnath Yatra Bus Accident : अमर यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

SCROLL FOR NEXT