चंद्रपूर/ भंडारा : भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा (Bhandara Rain Update) इशारा देण्यात आल्याने संभाव्य धाेका टाळण्यासाठी भंडारा जिल्हाधिकारी यांनी सर्व शाळांना (School holidays in bhandara) उद्या (बुधवार) सुटी जाहीर केली आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची (Chandrapur Rain Update) संततधार सुरू आहे. पावसामुळंं (rain) महाराष्ट्र आणि तेलंगणाचा संपर्क तुटला आहे. नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे असे आवाहन चंद्रपूरच्या प्रशासनाने केले आहे. (Maharashtra Rain Update)
भंडा-यात उद्या शाळांना सुटी
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अलर्ट नुसार भंडारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट घोषित केल्याने जिल्ह्यात मुसळधार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता लक्षात घेता संभाव्य अपघात टाळण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा, अंगणवाडी, शिकवणी वर्ग यांना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी उद्या (बुधवार 10 ऑगस्ट) सुट्टी जाहीर केली आहेत. या आदेशाचे उलंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई ही करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचा तेलंगणाशी संपर्क तुटला
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वर्धा नदीवर अमरावती-यवतमाळ जिल्ह्यात बांधलेल्या अप्पर व लोअर वर्धा या धरणांमधून मोठा विसर्ग होत असल्याने वर्धा नदी पात्रात पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. महिनाभरात तिसऱ्यांदा महाराष्ट्राचा तेलंगणाशी संपर्क तुटला आहे.
बल्लारपूरात पावसाचा जाेर वाढला
बल्लारपूर शहराजवळच्या वर्धा नदी पुलावर पुराचे पाणी चढल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वर्धा नदीच्या पुरामुळे आसपासच्या सर्वच पुलांवर पाणी चढल्याने वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यात गेल्या 24 तासात 127 मिलिमीटर एवढ्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पुढील काही तासात चंद्रपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
वर्धा, इरई व पैनगंगा या नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तर घरा बाहेर पडावे असे आवाहन डॉ. कांचन जगताप (तहसीलदार, बल्लारपूर) यांनी केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.