Maharashtra : इकडं मंत्रिमंडळ विस्तार; तिकडं काॅंग्रेसचा विराेधी पक्षनेते पदावर दावा

आज राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. नवे मंत्रिमंडळ कायदेशीर की बेकायदेशीर ते सर्वोच्च न्यायालय ठरवेल पण तूर्तास नव्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा असेही बाळासाहेब थाेरात यांनी नमूद केले.
Balasaheb Thorat, Maharashtra Mantri Mandal Vistar 2022, Shirdi, Maharashtra
Balasaheb Thorat, Maharashtra Mantri Mandal Vistar 2022, Shirdi, MaharashtraSaam Tv
Published On

- माेबीन खान

Balasaheb Thorat : राज्याच्या मंत्रिमंडळाचा (Maharashtra mantrimandal vistar 2022) आज विस्तार झाला. नवे मंत्रिमंडळ झाल्याने राज्यातील विराेधी पक्षातील नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान काॅंग्रेस नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात (Balasaheb Thorat) यांनी विराेधी पक्ष नेते पदासाठी काॅंग्रेसचा दावा केला. ते शिर्डी येथे बाेलत हाेते. (Shirdi Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde lates news) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis latest news) यांच्या सरकारनं दीड महिन्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन केल्यानं काॅंग्रेसचे नेते थाेरात म्हणाले मधल्या काळात सरकारच नाही असे वाटत होतं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन बसले होते. अनेक खात्यांचा वाद आजही शिल्लक आहे. कोणतेही मतभेद न ठेवता आज शपथ तुम्ही घेताय. ठीक आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा. जनतेसाठी काम करा एवढचं सांगू इच्छिताे असंही थाेरात यांनी नमूद केले.

Balasaheb Thorat, Maharashtra Mantri Mandal Vistar 2022, Shirdi, Maharashtra
Yashomati Thakur : शिंदे-फडणवीस सरकारचं हे ‘व्हाईट वॉश’ मंत्रिमंडळ आहे का ? (व्हिडिओ पाहा)

सरकारचा महिलांबाबत असंवेदनशील

नव्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान नाही. याऊलट महिला अत्याचाराचे आरोप असणा-यांना, टीईटी घोटाळ्याचे डाग असणा-यांना मोठ्या सन्मानाने मंत्री बनवले आहे. त्यामुळे महिलांबाबत या सरकारचा दृष्टीकोन किती असंवेदनशील आहे हे दिसून येते असेही माजी मंत्री थाेरात यांनी नमूद केले.

विरोधी पक्ष नेते पदावर काॅंग्रेसचा दावा

आज मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर विराेधी पक्ष नेते पदासाठी काॅंग्रेसनं दावा केला. काॅंग्रेस नेते थाेरात म्हणाले विराेधी पक्ष नेतेपद आमच्याकडं असावे असे वाटतं. आमचा आग्रह त्यासाठी राहणार आहे. वेळप्रसंगी एकत्र बसून चर्चा करू मात्र आमचा आग्रह कायम राहणार असंही थाेरात यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Balasaheb Thorat, Maharashtra Mantri Mandal Vistar 2022, Shirdi, Maharashtra
Maharashtra Rain : मुंबईसह राज्याला पावसानं झाेडपलं, वाचा कूठं काय घडलं
Balasaheb Thorat, Maharashtra Mantri Mandal Vistar 2022, Shirdi, Maharashtra
Maharashtra : 'आजही त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खूले'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com