Bhandara Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Bhandara Crime: भंडाऱ्यात 'सैराट'ची पुनरावृत्ती, आंतरजातीय विवाहाचा राग, सासू अन् मेहुण्याने तरुणाला संपवलं

Bhandara Crime News: भंडाऱ्यामध्ये तरुणाची सासू आणि मेहुण्याने निर्घृण हत्या केली. पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात ठेवून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली.

Priya More

Summary -

  • भंडाऱ्यात ‘सैराट’ चित्रपटासारखी ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली

  • आंतरजातीय विवाहामुळे सासू आणि मेहुण्याने कट रचून जावयाची हत्या केली

  • धारदार शस्त्रांनी वार करून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली

  • या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली

शुभम देशमुख, भंडारा

भंडाऱ्यामध्ये 'सैराट' चित्रपटासारखी घटना घडली. आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. तरुणीच्या आई आणि भावाने तिच्या नवऱ्याला संपवलं. शेतामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या घटनेमुळे भंडाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.

प्रेमाला जातीच्या भिंतीत अडकवू पाहणाऱ्या मानसिकतेतून पुन्हा एकदा रक्ताचा सडा पडला आहे. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील बेटाळा येथे झालेल्या आकाश शेंडे या तरुणाच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ही हत्या ऑनर किलिंग असल्याचे समोर आले आहे. आपल्याच जावयाचा जीव घेण्यासाठी सासू आणि मेहुण्याने सुपारी देऊन हा रक्तरंजित कट रचला होता.

हत्या Summary Pointers (Marathi – किमान 4)

  • भंडाऱ्यात ‘सैराट’ चित्रपटासारखी ऑनर किलिंगची धक्कादायक घटना.

  • आंतरजातीय विवाहामुळे सासू आणि मेहुण्याने कट रचून जावयाची हत्या केली.

  • धारदार शस्त्रांनी वार करून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला.

  • पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.Summary Pointers (Marathi – किमान 4)

    • भंडाऱ्यात ‘सैराट’ चित्रपटासारखी ऑनर किलिंगची धक्कादायक घटना.

    • आंतरजातीय विवाहामुळे सासू आणि मेहुण्याने कट रचून जावयाची हत्या केली.

    • धारदार शस्त्रांनी वार करून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला.

    • पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.करण्यात आलेल्या आकाश शेंडेने काही दिवसांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. मात्र, हा विवाह मुलीच्या घरच्यांना मान्य नव्हता. त्यांनी या लग्नाला विरोध केला असताना दोघांनी पळून जाऊ लग्न केले होते. याच रागातून आकाशची सासू अंजू कुंभलकर आणि मेहुणा चेतन कुंभलकर यांनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले. घटनेच्या रात्री आकाशचा मित्र भारत मोहतुरेने कटानुसार फोन करून घराबाहेर बोलावले.

त्यानंतर आरोपींनी ठरल्याप्रमाणे आकाशची धारदार शस्त्रांनी वार करत हत्या केली. आकाश रात्री घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. तर बेटाळा शिवारात त्याचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. मोहाडी पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक पुरावे आणि संशयावरून पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले आणि त्यांची कसून चौकशी केली.

आकाशच्या सासू आणि मेहुण्याने इतर तीन साथीदारांच्या मदतीने ही हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी अंजू कुंभलकर, चेतन कुंभलकर, भारत मोहतुरे, आणि इतर दोन साथीदार यांना अटक केली. या घटनेमुळे बेटाळा परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण आहे. आकाशचा अशाप्रकारे क्रूर अंत केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून स्वतःच्याच नातेवाईकांनी अशा प्रकारे हत्येचा कट रचल्याने नात्यांमधील क्रूरता समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई–नवी मुंबई विमानतळ मेट्रोला मंजुरी, ६ महिन्यांत भूसंपादनाचे आदेश

कॉलेजमधील जातीय भेदभावाविरोधात कडक नियम; कुणाचा विरोध तर कुणाचा पाठिंबा? UGC नियम आहे तरी काय?

Dry Cleaning : लॉंड्रिमध्ये होतात तसे कपडे घरच्या घरी करा ड्राय क्लीन, वापरा 'या' सोप्या टिप्स

Slim Fit Saree Draping Tips: साडीमध्ये स्लिम फिट दिसण्यासाठी फॉलो करा या 5 सोप्या ट्रिक्स

अकोला महापालिकेत ट्विस्ट, भाजप आणि मविआनंही केला सत्तास्थापनेचा दावा, VIDEO

SCROLL FOR NEXT