35 हजार रुपयांची मागणी करणाऱ्या तलाठ्याला भंडारा एसीबीकडून अटक

 

SaamTV

महाराष्ट्र

35 हजार रुपयांची मागणी करणाऱ्या तलाठ्याला भंडारा एसीबीकडून अटक

शेतीचे फेरफार करून देण्यासाठी शेतकऱ्याकडून 35 हजार रुपयांची मागणी करणाऱ्या तलाठ्याला भंडारा लाचलुचपत विभागाने अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजित घोरमारे

भंडारा - लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथील तलाठ्याला लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. शेतीचे फेरफार करून देण्यासाठी 35 हजार रुपयांची लाच या तलाठ्याने एका शेतकऱ्याकडून मागितली होती. विदार्थ कोठीराम मेश्राम वय 52 वर्ष असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. Bhandara ACB arrests Talathi for demanding Rs 35,000

तक्रारदार शेतकऱ्याची पिंपळगाव येथे वडिलोपार्जित शेती आहे. त्यांनी हिस्से वाटप करून शेतीचा फेरफार करण्यासाठी पिंपळगाव येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. यावेळी आरोपी तलाठी विदार्थ मेश्राम यांनी तक्रारदारास फेरफार करून देण्यासाठी 35 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली आहे.

मात्र तक्रारदारास लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी भंडारा लाचलुचपत विभाग गाठत तक्रार दिली. लाचलुचपत विभागाने तक्रारीची शहानिशा करून सापळा रचून आरोपीस रंगेहात पकडण्यात आले. आरोपी द्वारे 35 हजार रूपयाची लाच घेण्याची तयारी दर्शविल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. एसीबीच्या या धडक कार्रवाईने भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss House: बिग बॉस मराठी६ सुरू होण्याआधी घराची पहिली झलक आली समोर; रहस्यांनी भरलेल्या घरात काय आहे नवीन?

Mahayuti Manifesto: लाडकींना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, बेस्ट प्रवासात ५० टक्के सूट; मुंबईकरांसाठी महायुतीकडून घोषणांचा पाऊस

Viral Video: 9 वर्षांनंतर अचानक समोर आला बॉयफ्रेंड आणि....! लॉन्ग डिस्टन्स कपलचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Tilgul Ladoo: तिळगुळ लाडू मऊ होण्यासाठी वापरा 'या' ३ सोप्या ट्रिक्स; ही आहे सोपी रेसिपी

Pune : प्रशांत जगतापांचे गुंड टिपू पठाणशी "घनिष्ट" संबंध? जामिनावर बाहेर आलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून आरोप

SCROLL FOR NEXT