बुलेट चालवताय मग ही बातमी नक्कीच वाचा...

कर्णकर्कश बुलेटचे सायलेन्सर काढून, त्यावर रोड-रोलर फिरवण्याची कारवाई कल्याण वाहतूक पोलिसांनी केलीय.
Action Against Bullet

Action Against Bullet

Pradip Bhanage 

Published On

प्रदीप भणगे

कल्याण : बुलेट गाडीवरून हवा करत फिरणाऱ्या अतिउत्साही युवकांची हवा काढण्याची कारवाई कल्याण वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केलीय. बुलेट गाडीला मॉडीफायर सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज करत फिरणारे दुचाकीस्वार आपण अनेकदा पाहत असतो. हॉस्पिटल्स, शाळा, महाविद्यालये तसेच इतर शांत व सार्वजनिक ठिकाणी या सायलेन्सरमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असते. If you run a bullet then definitely read this news

बऱ्याच बुलेटला असणारे सायलेन्सर एखाद्या फटाक्यासारखा आवाज करतात ज्याचा सर्वसामान्यांना बऱ्याचदा त्रास होत असतो. मात्र आता अश्याच कर्णकर्कश आवाज करणाऱ्या व ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बुलेट गाड्यांवर कल्याण वाहतूक विभागाने कारवाई केली आहे. मागील तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या या कारवाईमध्ये ३०० मॉडीफायर सायलेन्सर असणाऱ्या बुलेट, आणि ६४ ब्लॅक फिल्म असणाऱ्या चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

<div class="paragraphs"><p>Action Against Bullet </p></div>
फ्लाईंग सिख मिल्खा सिंग यांचे निधन

कल्याण मधील दुर्गाडी पुलाजवळ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटच्या सायलेन्सरवर पोलिसांनी रोडरोलर फिरवत कारवाई केली. बुलेटच्या अश्या कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले वृद्ध नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत असल्याने यापुढेही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर अशीच कारवाई केली जाईल असे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com