Bhagyashri Atram joins Sharad Pawar group Saam Tv
महाराष्ट्र

Bhagyashri Atram: भाग्यश्री आत्राम यांनी तुतारी फुंकताच वडिलांवर केला हल्लाबोल, धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात लढवणार निवडणूक?

Bhagyashri Atram joins Sharad Pawar group: धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात केला पक्षप्रवेश.

Satish Kengar

मंगेश भांडेकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Latest Gadchiroli News in Marathi : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गट अजित पवार गटाला एकामागून एक धक्का देताना दिसत आहे. आज मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर भाग्यश्री आत्राम यांनी स्वतःच्या वडिलांवरच हल्लाबोल केला आहे.

भाग्यश्री आत्राम म्हणाल्या आहेत की, ''मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात अनेक प्रश्न रेंगाळले आहेत. रस्त्यांची समस्या असताना कार्यकर्त्यांची गर्दी होणे, हे आपल्यावरील प्रेम दिसतं. आदिवासी नागरिक, महिलांचे प्रश्न दुर्लक्षित करण्यात आलेत.''

आपले मंत्री साहेब येतात आणि जातात, समस्यांकडे दुर्लक्ष करतात, असं म्हणत भाग्यश्री यांनी धर्मरावबाबा आत्राम यांना लक्ष्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत त्या अहेरी विधानसभा मतदारसंघातून स्वतःच्या वडिलांविरोधात निवडणूक लढू शकतात, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

वडिलांना मुलीचे प्रत्युत्तर

भाग्यश्री आत्राम शरद पवार गटात प्रवेश करणार ही बातमी समोर आल्यानंतर धर्मरावबाबा आत्राम म्हणाले होते की, 'माझी मुलगी अन् जावयाला नदीत फेकून द्या.' यावर प्रत्युत्तर देत भाग्यश्री म्हणाल्या की, ''धर्मरावबाबा आत्राम माझे वडील आहेत, मी आशीर्वाद घेईन. मागच्या सभेत मला नदीत ढकलून देण्याची भाषा केली, ते चुकीचे होते. मंचावर अजितदादा होते, महिला आयोग अध्यक्षा होत्या, तरीही ते बोलले.''

भाग्यश्री आत्राम पुढे म्हणाल्या की, ''मी घर फोडून जात नाहीये, धर्मरावबाबा हे नक्षलांच्या तावडीत होते. तेव्हा शरद पवार यांनी मध्यस्थी केली. मी त्यांच्या उपकाराची परतफेड केली आहे. बाबावरील फिल्ममधे त्यांनी कबूल केले आहे.'' त्या म्हणाल्या, ''अजितदादा यांनी म्हटले, चूक झाली. तुम्हीही शरद पवार गटात या, चूक सुधारा. मी शरद पवार यांचे ऋण विसरू शकत नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

Maharashtra Live News Update: आदिवासी भिल्ल समाजाचा येवला तहसिलवर मोर्चा

अंगणाडी सेविकांना भाऊबीजेचं गिफ्ट! दिवाळीचा बोनस कधी मिळणार? आदिती तटकरेंनी थेट तारीख सांगितली

Barshi News : अतिवृष्टीत शेतीचे नुकसान; विवंचनेत शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल, शासनाकडून कुटुंबीयांना मदतीची मागणी

Nanded Rain : गोदावरी, असना नदीच्या पुराचे पाणी शेतात; शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचा झाला चिखल

SCROLL FOR NEXT