Eknath Shinde & Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Loksabha Election 2024: शिंदे गटाच्या आणखी एका जागेवर भाजपचा दावा; केंद्रीय मंत्री भागवत कराड लोकसभा लढण्यास इच्छुक

Maharashtra Politics: छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी मी स्वतः इच्छुक असल्याचे सांगत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी या जागेवर दावा केला आहे.

भारत नागणे

Chhatrapati Sambhajinagar Loksabha Election:

राजकीय वर्तुळात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यातील महायुतीमध्ये अनेक जागांवरुन रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरही भारतीय जनता पक्षाने दावा केल्याने शिवसेना शिंदे गटाची धाकधुक वाढली आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी मी स्वतः इच्छुक असल्याचे सांगत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी या जागेवर दावा केला आहे. छत्रपती संभाजीनगर या जागेवर यापूर्वीच शिवसेनेने दावा सांगितला असतानाच, आता भाजपानेही ही जागेवर दावा केल्याने महायुतीमध्ये चुरस वाढली आहे.

डॉक्टर भागवत कराड (Bhagwat Karad) आज पंढरपूरला श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाने तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघातून निवडणुकीसाठी मी स्वतः इच्छुक आहे.परंतु अद्याप वरिष्ठ पातळीवरून उमेदवारी संदर्भातील कोणताही निर्णय झालेला नाही, महायुतीचे नेते एकत्रित बसून या जागेचा तिढा सोडवतील अशी अपेक्षाही मंत्री कराड यांनी व्यक्त केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या उमेदवारीवरूनही भाजप आणि शिंदे गट दावे-प्रतिदावे करत आहेत. सोशल मीडियावर दोन्हीकडून गटाकडून दबावाचं राजकारण सुरु आहे. अशातच आता मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या समर्थकांकडूनरत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघावर दावा सांगणारे स्टेटस ठेवले जात आहेत. त्यामुळे ही जागा कोणाला जाणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Traffic Alert : ठाणे - घोडबंदर मार्ग पुढील पाच दिवस वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणता?

Maharashtra Live News Update: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

SCROLL FOR NEXT