Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणा कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Navneet Rana Latest News: २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत खासदार नवनीत राणा काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडून आल्या होत्या.
Navneet Rana News
Navneet Rana NewsSaam TV
Published On

अमर घटारे, साम टीव्ही

Navneet Rana Amravati Lok Sabha Election

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून कोणत्याही क्षणी निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर अनेक पक्षांनी आपापल्या पक्षातील उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. एकीकडे राज्यातील महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरू असताना, दुसरीकडे अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Navneet Rana News
Maharashtra Politics: भाजपचे खरे टार्गेट मुख्यमंत्री शिंदेच, मनोज जरांगे फक्त निमित्त; काँग्रेसचा मोठा आरोप

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आगामी लोकसभेची निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढवणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत खासदार नवनीत राणा काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडून आल्या होत्या.

त्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला. गेल्या ५ वर्षापासून नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा भाजपला समर्थन देत आहेत. त्यामुळे आता आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने सुद्धा आम्हाला पाठिंबा द्यावा, यासाठी नवनीत राणा आग्रही असल्याची माहिती आहे.  (Latest Marathi News)

मात्र, नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशा प्रकारची चर्चा भाजप पक्षात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती लोकसभेत भाजपचा उमेदवार असेल, असे विधान केले होते.

आता थेट नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र हे सगळं असताना खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकालही महत्वाचा ठरणार आहे. काही दिवसांमध्ये सुप्रीम कोर्ट नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर निकाल देणार आहे. त्यामुळे या निकालावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

Navneet Rana News
Rahul Gandhi: राहुल गांधींच्या नाशिक दौऱ्याची तारीख ठरली; गोदावरीच्या आरतीसह करणार काळारामाचे दर्शन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com