अभिजीत देशमुख
ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघातून सुषमा अंधारे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी माझं नाव चर्चेत आहे पण मला त्याबाबत अधिकृत निरोप आलेला नाही, मला फक्त काम करायचंय. पक्षाने मला सांगितलं तर मी वाटेल त्या उमेदवाराच्या विरोधात लढेन असं सूचक विधान केलं आहे.
श्रीकांत शिंदे म्हणजे फार मोठा अडचणीचा डोंगर असं वाटत नाही. त्यांच्याशी समोरं जाताना फार मोठं आव्हान आहे असं वाटत नसल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. मुक्तसंवाद अभियानांतर्गत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा आज कल्याण दौरा होता. या दौरादरम्यान त्यांनी अग्रवाल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी कोळशेवाडी शहर शाखेत पत्रकार परिषद घेतली संध्याकाळी सुषमा अंधारे यांचे वाळधुनी परिसरात जाहीर सभा होणार आहे.
सरकारने मनोज जरांगे पाटील प्रकरणी एसआयटी चौकशी लावण्याचे आदेश दिलेत याबाबत बोलताना सरकारने ही चौकशी करायला हरकत नाही मात्र त्यासोबतच मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण एसटी आरक्षणाच्या लढ्यात ज्या तीन-चारशे लोकांचा बळी गेला आहे. त्यांची एसआयटी चौकशी सरकार लावणार आहे का ? सरकारला जर चौकशी करायची असेल तर भीमा कोरेगावच्या एसआयटी चौकशीचे काय झालं ? समृद्धी महामार्गावर भीषण अपघातामध्ये ज्या 28 ते 30 लोकांचा मृत्यू झाला. एकाच वेळेला हे सगळे अपघात होतात याचे एखादे चौकशी सरकारी लावणार आहे का ?असा सवाल त्यांनी केला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कल्याण वाढती गुन्हेगारी ,वाढती ठेकेदारी यामुळे नागरिकांसह पोलीस यंत्रणा सुद्धा दहशतीखाली आहे. दस्तूर खुद्द भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या शहर प्रमुखाला गोळ्या घालाव्यात याचा अर्थ सत्ताधाऱ्यांमधला अंतर्गत गॅंगवर किती टिकेला पोहोचला हे दिसून येते. या परिस्थितीत निश्चितपणे वाटतं येणारी निवडणूक श्रीकांत शिंदे यांच्यासाठी इतकी सोपी असणार नाही. जितकी सोपी त्यांना मुख्यमंत्री पुत्र म्हणून वाटत आहे . मुख्यमंत्री स्वतःचे प्रोजेक्शन शेतकरीपुत्र म्हणून करत असले तरी श्रीकांत शिंदे यांचा प्रोजेक्शन शेतकरी पुत्र म्हणून करू शकणार नाहीत. श्रीकांत शिंदे हे अत्यंत गर्भ श्रीमंत आणि पक्ष फोडण्यात तरबेज असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.