Akola Breaking News: रामदास आठवलेंच्या निकटवर्तीयावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

Akola Crime News: अकोल्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कुख्यात गुंड गजानन काशिनाथ कांबळे (वय ४९) याच्यावर पोलिसांनी एमपीडीए कारवाई केली आहे.
Ramdas Athawale, Gajanan kamble
Ramdas Athawale, Gajanan kambleSaam TV
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही अकोला

Akola Police Action Gajanan Kamble

अकोल्यातून गुन्हेगारी आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उड़वणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. कुख्यात गुंड गजानन काशिनाथ कांबळे (वय ४९) याच्यावर अकोला पोलिसांनी एमपीडीए कारवाई केली आहे. गजानन याला मंगळवारी (ता २७) रात्री अकोला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ramdas Athawale, Gajanan kamble
Politics News: विधानसभा अध्यक्षांची सर्वात मोठी कारवाई; भाजपचे १५ आमदार तडकाफडकी निलंबित, राजकारणात खळबळ

त्यानंतर कागदोपत्री कारवाई करून आता १ वर्षासाठी गजानन कांबळेला अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केलंय. गजानन कांबळे हे भारतीय रिपब्लिकन पार्टी म्हणजेचं रिपाईचे अकोला महानगराध्यक्ष आहे. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. (Latest Marathi News)

तसेच अनेक राजकीय आणि अधिकाऱ्यांशी त्यांचे संबध आहेत. बलात्कार, जबरी चोरी करतांना इच्छापूर्वक दुखापत करणे, बलादग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापतीची भिती घालणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे, अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

मालमत्ता जबरीने घेण्यासाठी किंवा अवैध कृती करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक दूखापत पोहचविणे, ठकवणूक करणे, प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज होवून दंगा करणे, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन करणे, असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत.

यापूर्वी देखील पोलिसांनी आरोपी गजाजन कांबळेवर विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई केली होती. मात्र, या कारवाईचा त्याच्यावर काहीच परिणाम झालेला नव्हता. तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने अखेर पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, अकोला पोलिसांचा प्रतिबंधक कारवाईवर चांगलाच जोर वाढला आहे. शहरात गुंडगिरी करत दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलीस चांगलाच इंगा दाखवत आहेत. गेल्या दोन महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेतील पीएसआय आशिष शिंदे यांनी जिल्ह्यातील ६ सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

Ramdas Athawale, Gajanan kamble
Shetkari Sanman Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आज खात्यात जमा होणार ६ हजार रुपये, जाणून घ्या कसे?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com