भद्रकाली पोलिसांनी 24 तासत घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या
भद्रकाली पोलिसांनी 24 तासत घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या  सागर गायकवाड
महाराष्ट्र

भद्रकाली पोलिसांनी 24 तासत घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर गायकवाड

नाशिक - येथील भद्रकाली पोलिसांकडून 24 तासत दोन घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तब्बल 1 लाख 32 हजार 500 रुपयांचा ऐवज संशयितांकडून जप्त करण्यात आला आहे. सविस्तर घटना अशी की, भद्रकाली भाजी मार्केट परिसरातील अर्जुन राठोड यांचे श्रणय मोबाईल शॉपी दुकान अज्ञात संशयितांकडून सुमारे ७० हजार रुपये किमतीचे मोबाईल आणि अन्य साहित्य लंपास केल्याची घटना शुक्रवार घडली होती. शनिवार राठोड यांच्या तक्रारीवरून अज्ञात संशयितांविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे देखील पहा -

दरम्यान, बुधवारी कॉटर ५४ येथील घरात घरफोडी होऊन देवीचा मुकुट आणि दागिने चोरी झाल्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. भद्रकाली गुन्हे शोध पथकाकडून तपास सुरू होता. गुन्हे पथकाचे पोलीस हवालदार यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी नानावली भागातील एका अल्पवयीन संशयितास रविवार रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने अन्य तिघा साथीदारांचे नावे सांगितली. त्यानुसार कारवाई करत अन्य दोघा संशयितांना ताब्यात घेतले. तिघांची कसून चौकशी केली असता त्यांनी विविध ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यात भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतील दोन आणि मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीतील एक अशा तीन घरफोडी उघडकीस आले आहे.

आरोपींकडून ९० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अन्य घरफोडी देखील उघडकीस येण्याची शक्यता आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात ४५ हजारांचे ४ मोबाइल, ७५ हजाराचा चांदी मिश्रित देवीचा मुकुट १२ हजारांचे सोन्याचे कानातले आणि एक तार असा सुमारे १ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा ऐवज संशयितांकडून हस्तगत करण्यात आला आहे. अन्य एक संशयित अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Health Care Tips: कडक उन्हाळ्यात सुरू झाला पावसाळा, अशी घ्याल स्वत:ची काळजी

Kitchen Tips: माइक्रोवेव्ह क्लिन करताना 'या' चुका टाळा

Hardik Pandya: 'मला त्याच्या नेतृत्वाची पद्धत आवडते..' हार्दिकला अंहकारी म्हणणाऱ्या डिव्हीलियर्सचं स्पष्टीकरण

PM Narendra Modi : पाचव्या टप्प्यासाठी PM नरेंद्र मोदी सज्ज; मुंबईत रोड शो, कल्याण आणि नाशिकमध्ये जाहीर सभा

Kolhapur News: दुर्दैवी घटना! पैशासाठी सावकाराचा तगादा, जीवे मारण्याची धमकी, शेतकऱ्याने संपवले आयुष्य

SCROLL FOR NEXT