24 वर्षाची महिला बनली 21 मुलांची आई! ; लहानपणापासूनचे होते स्वप्न

क्रिस्टीना ओझटर्कने वयाच्या १७ व्या वर्षी आपल्या पहिल्या बाळाला नैसर्गिकरित्या जन्म दिला.
24 वर्षाची महिला बनली 21 मुलांची आई! ; लहानपणापासूनचे होते स्वप्न
24 वर्षाची महिला बनली 21 मुलांची आई! ; लहानपणापासूनचे होते स्वप्न Instagram

क्रिस्टीना ओझटर्कने वयाच्या १७ व्या वर्षी आपल्या पहिल्या बाळाला नैसर्गिकरित्या जन्म दिला. त्यानंतर अवघ्या 10 महिन्यांत 10 सरोगेट बाळांना जन्म दिला. दहाव्या सरोगेटपासून ती आणि तिच्या पतीने तब्बल 21 बाळांना जन्म दिला आहे. रशियात राहणारी क्रिस्टीना 21 मुलांची आई आहे. तर महिलेने तिच्या 21 मुलांचा सांभाळ करण्यासाठी चक्क 16 आया ठेवल्या आहेत.

क्रिस्टीना ओझटर्क जॉर्जियाच्या, गॅलिपमधील एका करोडपतीची पत्नी आहे, हिने गेल्या वर्षी मार्च ते या वर्षी जुलै दरम्यान सरोगेट्सद्वारे पालक होण्यासाठी 1,46,78,156 रुपये खर्च केले आहेत. मूळची रशियाची असलेली क्रिस्टीना घरात राहणाऱ्या 16 आयांवर दरवर्षी 72,08,265 रुपये खर्च करते. काळानुसार वेगाने वाढणाऱ्या मुलांची काळजी घेण्यासाठी आया 24 तास काम करतात. कुटुंबात क्रिस्टीना तिच्या पतीच्या पहिल्या पत्नीच्या दोन मुलांसह एकूण 23 मुले एकाच घरात राहतात. क्रिस्टीना आग्रहाने सांगते की ती एक व्यावहारिक आई आहे. क्रिस्टीना म्हणते, “मी प्रत्येक वेळी मुलांसोबत असते, प्रत्येक आई जे काही करते ते करते.

क्रिस्टीनाचे लहानपणापासूनचे स्वप्न

“मी लहानपणापासून हे स्वप्न पाहत आहे. माझ्या पतीनेही एक मोठे, आनंदी कुटुंब असावे असे स्वप्न पाहिले होते. म्हणून आम्ही भेटल्यानंतर आम्ही आमचे स्वप्न प्रत्यक्षात आणू लागलो,” क्रिस्टीनाने माध्यमांना सांगितले

दरमहा इतका खर्च होतो?

क्रिस्टीनाने सोशल मीडियामधील टाकलेल्या एका पोस्टवर दरमहा किती खर्च लागतो या बद्द्ल माहीती दिली आहे. तिच्या मोठ्या कुटुंबासाठी सरोगेट्सना सुमारे £1,38,000 दिले आहेत. यापूर्वी, क्रिस्टीनाने द सनला सांगितले होते की ती मुलांच्या आवश्यक गोष्टींसाठी दर आठवड्याला सुमारे £3,500 ते £4,200 खर्च करावा लागतो. तर मुलांना सांभाळणाऱ्या आयांसाठी, त्यांना आठवड्याला £350 दिले जातात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com