Kolhapur News: दुर्दैवी घटना! पैशासाठी सावकाराचा तगादा, जीवे मारण्याची धमकी, शेतकऱ्याने संपवले आयुष्य

Kolhapur Breaking News: आत्महत्या करताना शेतकऱ्याने लिहिलेल्या चिठ्ठीत पाच सावकारांची नावे उघड करण्यात आली आहेत. या घटनेने कोल्हापुरमध्ये खळबळ उडाली आहे.
Kolhapur Breaking News:
Kolhapur Breaking News: Saamtv

रणजित माजगावकर, कोल्हापूर, ता. १४ मे २०२४

खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना कोल्हापुरमध्ये घडली. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये ही घटना घडली. आत्महत्या करताना शेतकऱ्याने लिहिलेल्या चिठ्ठीत पाच सावकारांची नावे उघड करण्यात आली आहेत. या घटनेने कोल्हापुरमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून कोल्हापुरच्या शिरोळ तालुक्यातील शेडशाळ इथल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. भालचंद्र तकडे असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या संदर्भात या शेतकऱ्याने त्याच्या खिशात चिठ्ठी ठेवून सावकारांच्या जाचाला कंटाळून हा निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे.

भालचंद्र तडके यांनी शेतीकरिता काही सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्या सावकारांकडून पैशाचा तगादा सुरू होता. त्यामुळे ते तणावाखाली होते. काल दुपारी भालचंद्र तडके यांनी शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या खिशात चिट्टी सापडली असून यामध्ये पाच सावकारांची नावे आहेत.

Kolhapur Breaking News:
Mumbai News: मोठी बातमी! खासदार नवनीत राणांच्या घरी चोरी, नोकरानेच केला हात साफ; गुन्हा दाखल

या सावकारांनी कर्जासाठी वारंवार तगादा लावला तसेच त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यांच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा मजकूर त्या चिठ्ठीत लिहिलेला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या संदर्भात कुरुंदवाड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Kolhapur Breaking News:
Ghatkopar Hording Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर; ४३ जणांवर उपचार सुरू, रात्रभर बचावकार्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com